मेटॅडोर व कारची आपसात धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:17 PM2018-11-26T22:17:57+5:302018-11-26T22:18:12+5:30
स्वीफ्ट कार व मेटॅडोरची आपसांत धडक होऊन दोन्ही वाहनांतील १० जण जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजतादरम्यान गावाजवळ घडली. यात मेटॅडोर चालकाचा फाय फ्रॅक्चर झाला असून उर्वरीतांना किरकोळ मार लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुरदोली : स्वीफ्ट कार व मेटॅडोरची आपसांत धडक होऊन दोन्ही वाहनांतील १० जण जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजतादरम्यान गावाजवळ घडली. यात मेटॅडोर चालकाचा फाय फ्रॅक्चर झाला असून उर्वरीतांना किरकोळ मार लागला.
प्राप्त माहितीनुसार, विजय बाबूराव चव्हाण (४५, भंडारा), निळकंठ समुनिया (४३), सुनील गजानन हटवार (४४,रा.तुमसर), ईश्वर कोरे (४३) व फुंडे (रा.आमगाव) व फुंडे हे गडेगाव (भंडारा) येथील अशोक लेलँड कंपनीत कार्यरत असून ते स्वीफ्ट कार क्रमांक एमएच ३६- झेड ४२९८ ने मांडोदेवी व हाजराफॉल बघून भंडारा येथे परत जात होते.
तर मेटॅडोर क्रमांक एमएच २७- सी ७४० गोंदिया येथील श्याम ट्रेडर्समधील टाईल्स साकोली येथे सोडून परत जात होता. गावाजवळ रविवारी (दि.२५) रात्री ९ वाजतादरम्यान दोन्ही वाहनांची आपसांत धडक झाली. या धडकेत कारमध्ये बसलेले पाचही जण जखमी झाले. मेटॅडोर चालक धनराज वंजारी (रा.अदासी-तांडा) यांचा पाय फॅ्रक्चर झाला. तर गाडीतील अनिल नान्हू पुंगळे, धनराज नामदेव इंगोले (रा.कारंजा), विनेंद्र रामदार भेलावे, रूपेश जगन्नाथ भेलावे व ग्यानी भट यांना किरकोळ मार लागला. जखमींना १०८ क्रमांकाच्या वाहनाने गोंदियाला पाठविण्यात आले.