हवामान खात्याने दिला पावसाचा अंदाज; ढग आले दाटून, शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची वाढली चिंता

By कपिल केकत | Published: January 4, 2024 07:07 PM2024-01-04T19:07:40+5:302024-01-04T19:07:57+5:30

मागील महिनाभरापासून विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया जिल्ह्यात होत असून सर्वात जास्त थंडी येथेच पडत आहे.

Meteorological department gave rain forecast the common people along with the farmers got worried | हवामान खात्याने दिला पावसाचा अंदाज; ढग आले दाटून, शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची वाढली चिंता

हवामान खात्याने दिला पावसाचा अंदाज; ढग आले दाटून, शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची वाढली चिंता

गोंदिया : मागील महिनाभरापासून विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया जिल्ह्यात होत असून सर्वात जास्त थंडी येथेच पडत आहे. असे असतानाच गुरूवारी (दि.४) ढग दाटून आले असून दिवसभर पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यातच हवामान खात्याने शुक्रवारी (दि.५) पावसाची शक्यता वर्तविली आहे. अगोदरच थंडीचा जोर असल्यामुळे सर्दी व खोकल्याचे रूग्ण वाढले आहेत. त्यात आता पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने शेतकरीच नव्हे तर सर्वसामान्यांची आरोग्याला घेऊन चिंता वाढली आहे.

यंदा ऋतू चक्र कसे काय आहे याचा अंदाज घेणे कठीण झाले आहे व याची अनुभूती उन्हाळा व पावसाळ्यात चांगलीच आली आहे. उन्हाळ्यात जेवढे ऊन तापले नाही तेवढे जून महिन्यात तापले व जून महिन्यात पाऊस बरसला नसून हिवाळ्यात अवकाळी पाऊस जिल्ह्याला झोडपून नासाडी करताना दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्याचा शेवट व डिसेंबर महिन्याची सुरूवात अवकाळी पावसात गेली. त्यानंतर १० डिसेंबरपासून जिल्ह्याचे तापमान घसरत चालले असून जिल्हा विदर्भात सर्वात थंड जिल्हा ठरला आहे. अचानकच थंडीचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यात सर्दी, खोकला व तापाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात निघत आहेत.

असे असतानाच गुरूवारी (दि.४) जिल्ह्याचे कमाल तापमान २७.८ अंश तर किमान तापमान १३.५ अंशावर आले होते. किमान तापमानात जिल्हा विदर्भात पहिल्या क्रमांकावर होता. जिल्ह्यात थंडीचा जोर कायम असतानाच मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत आहे. मात्र गुरूवारी सकाळापासून ढग दाटून आले व पावसाचे वातावरण दिसून येत होते. यातही हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. वातावरणामुळे आरोग्याच्या तक्रारींना घेऊन जिल्हावासी त्रासले असतानाच आता पाऊस वातावरणात बदल होऊन आणखी त्रास वाढणार असल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे.

आठवडाभर ढगाळ वातावरण
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी (दि. ५) हलक्या पाऊस बरसू शकतो. तर त्यानंतर पुढे बुधवारपर्यंत (दि. १०) ढगाळ वातावरण जिल्ह्यात कायम राहणार आहे. एकंदर बदलत्या वातावरणाचा परिणाम जिल्हावासीयांना सहन करावा लागणार आहे. अगोदरच कोरोनामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण असताना त्यात आता अवकाळी पाऊस व बदलत्या वातावरणाने जिल्हावासीयांचे टेन्शन वाढविले आहे.

Web Title: Meteorological department gave rain forecast the common people along with the farmers got worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.