निवडणूक खर्चाचे सुक्ष्म निरीक्षण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 09:57 PM2018-05-16T21:57:58+5:302018-05-16T21:57:58+5:30

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार निश्चित झाले आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्ष व उमेदवाराचा होणारा खर्च दैनंदिन नोंदविणे आवश्यक आहे. सभा, प्रचार साहित्य, वाहन, अति महत्वाच्या नेत्यांच्या सभा, पोस्टर व बॅनर्स आदींचा खर्च निवडणूक खर्चात नोंदविणे गरजेचे आहे.

 Micro inspection of election expenditure | निवडणूक खर्चाचे सुक्ष्म निरीक्षण करा

निवडणूक खर्चाचे सुक्ष्म निरीक्षण करा

Next
ठळक मुद्देप्रभात दंडोतिया : समारंभ व जेवणावळीवर नजर ठेवा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार निश्चित झाले आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्ष व उमेदवाराचा होणारा खर्च दैनंदिन नोंदविणे आवश्यक आहे. सभा, प्रचार साहित्य, वाहन, अति महत्वाच्या नेत्यांच्या सभा, पोस्टर व बॅनर्स आदींचा खर्च निवडणूक खर्चात नोंदविणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा उमेदवार वस्तुस्थितीदर्शक खर्च नमूद करीत नाहीत. त्यामुळे सहाय्यक निवडणूक खर्च अधिकाºयांनी उमेदवार व पक्षाच्या खर्चावर करडी नजर ठेवण्याचे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक प्रभात दंडोतिया यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणूक खर्चाशी संबंधित नोडल अधिकारी व सहाय्यक निवडणूक खर्च अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते.
या बैठकीला उपजिल्हाधिकारी (निवडणूक) विलास ठाकरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक मातकर, कोषागार अधिकारी अमित मेश्राम व सर्व विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक खर्च अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
लोकसभा पोटनिवडणुकीच्या संबंधाने पक्ष व उमेदवाराचा होणारा खर्च याची १८ मे, २२ मे व २६ मे रोजी तपासणी करण्यात येणार आहे. यासाठीचा खर्च अहवाल तपासणी दिनांकाच्या एक दिवस अगोदरपर्यंत निवडणूक खर्च नोंदवहीत नोंदविण्याच्या सूचना निवडणूक खर्च निरिक्षकांनी दिल्या. खर्चाशी संबंधित सर्व अहवाल दररोज निवडणूक खर्च शाखेस पाठविण्यात यावे. उमेदवारांचे वाहन, सभा व प्रचार कार्य आदींची संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डींग करण्यात यावी. या व्हिडिओ रेकॉर्डींगची तपासणी करण्यात यावी. उमेदवारांनी सादर केलेला खर्च व रेकॉर्डींगमधील बाबी तपासून खर्च मान्य करण्यात यावा. स्टॅटिक सर्व्हेलन्स टिम मार्फत सुध्दा नियमित व्हिडिओ रेकॉर्र्डींग होणे आवश्यक आहे.
रोख व मद्य पकडणे या घटनेची व्हिडिओ रेकॉर्र्डींग आवश्यक असून प्रत्येक घटनाक्रमाचा पुरावा गोळा करण्यात यावा. रोख पकडल्याची घटना निदर्शनास आल्यास या घटनेची माहिती तात्काळ निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणूक खर्च निरिक्षक व आयकर खात्याला द्यावे. त्या आधारेच पुढील कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले. सभास्थळी येणाºया वाहनांची रेकॉर्र्डींग करताना प्रत्येक वाहनाची नंबरप्लेटसह रेकॉर्डींग करणे गरजेचे आहे. आपल्या परिसरातील बँकांमधून मोठ्या प्रमाणात रोख काढल्या गेली असल्यास त्याचीही चौकशी करण्यात यावी. निवडणूक काळात उमेदवारांनी आपल्या खात्यातून काढलेल्या रक्कमेचा तपशिल सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.
केवळ उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चावर विश्वास न ठेवता सहाय्यक निवडणूक खर्च अधिकारी यांनी आपल्या वैयक्तिक यंत्रणेमार्फत खर्चाची पडताळणी करावी. निवडणूक खर्च निरिक्षक यांच्याशी कायम संपर्क ठेवून काही अडचण आल्यास प्रभात दंडोतिया निवडणूक खर्च निरिक्षक यांच्याशी संपर्क साधावा. राजकीय पक्ष व उमेदवार यांचे खर्चाचे खाते वेगवेगळे असून खर्च नोंदणी करताना वेगवेगळी नोंदणी करावी, असे निर्देश दंडोतिया यांनी दिले. निवडणूक काळात होणाºया जेवणावळी व राजकीय पक्ष किंवा उमेदवार उपस्थित असलेले लग्न समारंभ यावर लक्ष ठेवण्याची सूचना केली.

Web Title:  Micro inspection of election expenditure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.