मायक्रोफायनान्स कंपनीने केली महिलांची फसवणूक

By Admin | Published: January 26, 2017 01:38 AM2017-01-26T01:38:36+5:302017-01-26T01:38:36+5:30

तिरोडा तालुक्यातील शहरी, ग्रामीण महिलांना बचत गटाच्या माध्यमातून प्रलोभन देवून पैसे कर्जाने देऊ व

Microfinance Company Deals Women's Fraud | मायक्रोफायनान्स कंपनीने केली महिलांची फसवणूक

मायक्रोफायनान्स कंपनीने केली महिलांची फसवणूक

googlenewsNext

माधुरी रहांगडाले : उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन
तिरोडा : तिरोडा तालुक्यातील शहरी, ग्रामीण महिलांना बचत गटाच्या माध्यमातून प्रलोभन देवून पैसे कर्जाने देऊ व निम्या दरावर देण्याचे आश्वासन व आर.बी.आय.सलग्न असल्याचे सांगून महिलांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप माधुरी रहांगडाले यांनी केला आहे.
कर्ज रुपात दिलेल्या रक्कमेची कमी वसुली तिप्पट करीत असल्याचे महिलांना लक्षात येताच मायक्रोफायनांस कंपनीच्या वसुलीसाठी येत असलेल्या कर्मचाऱ्यांना विचारपूस व आरबीआयसी संलग्न कागदाची पूर्तता, पासबूक व दस्तावेज मागीतले असता उलट धमकावने, शिवीगाळ करणे सुरू केले. हा प्रकार सर्वांसमोर येताच, निर्मल उज्वल क्रेडीट कॉ. सोसायटी जि. नागपूर, एल.एन.टी., जनलक्ष्मी, उत्कर्ष मायक्रो फायन्नांस, आर.बी.एल. बँक, ग्रामीण कृटा, इसाफ माईक्रो फायनांस, शेयर महिला, युनिक फायनांस लिमिटेड नागपूर, स्वतंत्र फाईनांस, एस.के.एस. अन्य कंपनीने नोटबंदी दरम्यान वसुली, आर.डी.साठी येणे बंद केले.
महिलांकडून आर.डी. किस्तरुपात जास्त वसूल करुन नेले. महिलांशी असभ्य वागणूक करीत असल्याचे व मायक्रोफाईनांस कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर व कंपनी मालकावर गुन्हा नोंदविण्याची मागणी तालुक्यातील महिलांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन व तक्रार तिरोडा पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माधुरी रहांगडाले यांच्या नेतृत्वात तहसीलदार पटले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रुबीना शेख, संगीता वैरागडे, कविता परमार, रेशमा पठाण, सुनंदा साठवणे, जयश्री साबळे, आम्रपाली उके, निला पटले, संजय मेश्राम, शक्ती बैसे, मनोज तुरमाने, एच. जमईवार, वासनिक, आर. कडव, घनशाम चौधरी व ३०० च्यावर महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
जैन कलार समाजाचा मेळावा
गोंदिया : जैन कलार समाजाचा महिला मेळावा, स्रेहसंमेलन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम रविवार (दि.२९) जैन कलार समाज सांस्कृतिक भवन, पिंडकेपार रोड, गोंदिया येथे आयोजित करण्यात आले आहे. नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या हस्ते, तेजराम मोरघडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन होईल. या वेळी प्रामुख्याने जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके, रविंद्र दुरूगकर, प्राचार्य प्रल्हाद हरडे, जि.प. सदस्य शैलजा सोनवाने आदी उपस्थित राहतील.

Web Title: Microfinance Company Deals Women's Fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.