अड्याळ येथे लोकवर्गणीतून उभारला प्रवासी निवारा

By admin | Published: August 10, 2016 12:18 AM2016-08-10T00:18:21+5:302016-08-10T00:18:21+5:30

गावहितासाठी येथील व्यापारी मंडळ व दान देणाऱ्यांची अड्याळ गावात कमी नाही. त्यामुळेच की काय लोकप्रतिनिधींनी जरी दुर्लक्ष केले असले...

Migrant shelter raised in Adalal from Lokmargi | अड्याळ येथे लोकवर्गणीतून उभारला प्रवासी निवारा

अड्याळ येथे लोकवर्गणीतून उभारला प्रवासी निवारा

Next

ग्रामस्थांनी दाखविला एकोपा : वर्गणी देणाऱ्यांची लागणार यादी व होणार सत्कार
विशाल रणदिवे अड्याळ
गावहितासाठी येथील व्यापारी मंडळ व दान देणाऱ्यांची अड्याळ गावात कमी नाही. त्यामुळेच की काय लोकप्रतिनिधींनी जरी दुर्लक्ष केले असले तरी ग्रामस्थांनी प्रवाशांना भेडसावणारी समस्या लक्षात घेतली. व लोकसहभाग व लोकवर्गणीतून टूमदार छोटेसे बसथांबा उभारला.
या आधी आमदार रामचंद्र अवसरे यांच्या सोबत काही काळ राहणारे व भारतीय जनता पार्टीचे खासदार नाना पटोले यांच्या सोबत निवडणूक काळात राहणारे मुनिर शेख यांनी गावातील सामाजिक कार्यकर्ता राजू मुरकुटे या दोघांनी वर्गणी मिळेल तितकी त्या दुकानातून घेवून १५ दिवसात २० हजार किमतीचा प्रवासी निवारा लोकसहभागातून उभारला. लवकरच त्या ठिकाणी वर्गणीदारांची यादी व त्यांचा सत्कारासोबतच २० हजारांच्या पैशाच्या हिशोबाची सुद्धा माहिती देण्यात येणार आहे. कारण गावातील दान दाते देत असले तरी त्याचा हिशोब देणे हे गरजेचे आहे, असे मत येथील राजू मुरकुटे यांनी मांडले आहे. अशी माहिती दिल्यामुळे लोकांमध्ये विश्वास राहील. हा आहे पारदर्शकपणा, असाच राहिला तर कोणत्याही लहान मोठ्या कामात भ्रष्टाचार होणार नाही.
एवढ््या मोठ्या गावात राजकारण्यांच्या गडावर लोकवर्गणीतून जर बसस्थानक परिसरात प्रवासी निवारा होत असेल तर यापेक्षा या गावाचे दुर्भाग्य कोणते? याच रस्त्यावरून जिथे आधी प्रवाशांना साधी बसायला जागा नव्हती, पाण्यात थांबायचे कुठे या प्रश्नात प्रवासी राहयचे आणि इथून एसी असलेल्या, नसलेल्या गाड्यातून प्रवास करणारे अधिकारी, नेते मंडळींना या बसस्थानक, प्रवाशांची चिंता कशी नाही आली? असा संतप्त प्रश्न प्रवाशी करीत होते. आता बचाव होईल, प्रवाशांचा एवढा प्रवासी निवारा एका बाजूला किशोर पंचभाई यांनी भेट दिला तर दुसऱ्या बाजूला लोकवर्गणीतून साकारला.
काही जाणकारांच्या मते अड्याळमध्ये आधीसारखे तडफदार नेते राहिले नाही. असेही बोलले जाते. लोकसहभागातून बसस्थानकाची तात्पूरती व्यवस्था ग्रामस्थांनी केल्याने गावात आजही एकोपा नांदतो, याची जाण करून दिली आहे.
निवडणूक येते तेव्हा परिसरातील सर्वात मोठे गाव व लोकसंख्या असलेल्या अड्याळ गावामध्येच मोठी प्रचारसभा असते. मताचा जोगवा मागणारे राजकारणी त्यांच्या मतदारांच्या मदतीसाठी पुढाकार घेत नसल्याचे यावरून दिसून आले.

Web Title: Migrant shelter raised in Adalal from Lokmargi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.