दुध वाहून नेणाºया वाहनाने विद्यार्थ्यांना चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 05:58 PM2017-07-31T17:58:23+5:302017-07-31T18:01:11+5:30
पायी शाळेत जात असताना पाठी मागून येणाºया दूध संकलन वाहनाने शाळकरी विद्यार्थ्यांना चिरडले. या जबर धडकेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तर चार विद्यार्थी जखमी झाले.
आॅनलाईन लोकमत
ंंअर्जुनी मोरगाव (गोंदिया) : पायी शाळेत जात असताना पाठी मागून येणाºया दूध संकलन वाहनाने शाळकरी विद्यार्थ्यांना चिरडले. या जबर धडकेत एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तर चार विद्यार्थी जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि.३१) सकाळी ९.४५ चे सुमारास मुंगली येथे घडली. कल्याणी नरेश कांबळे (११) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. सोमवारी सकाळी मुंगली टोली येथील कल्याणी नरेश कांबळे (११), रोहिणी दौलत डोंगरवार (१०), हर्षा राजेश कापगते (१०), योगेश राजेश कापगते (६ ) व बादल तुलसीदास मेश्राम (७) हे गावातीलच जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत पायी जात होते. दरम्यान वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने कल्याणीचा जागीच मृत्यू झाला तर चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले.
जखमी विद्यार्थ्यांना गावकºयांनी तातडीने नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमी विद्यार्थ्यांवर प्रथमोपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी ब्रम्हपुरी येथे नेण्यात आले.
जखमी चार विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असून तीन विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी नवेगावबांध पोलिसांनी वाहनासह चालक मधुकर हिरामण राऊत याला ताब्यात घेतले. पुढील तपास सुरु आहे.