मोटारपंप खरेदीत लाखोंचा भ्रष्टाचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2017 12:12 AM2017-05-11T00:12:10+5:302017-05-11T00:12:10+5:30
जिल्हा परिषदेच्या यांत्रीकी विभागातील मानकर यांनी ओटा बांधकाम व बोरवेल खोदकाम लघुनळ पाणी पुरवठाव विद्युत मोटार पंप
पटोले यांची आयुक्तांकडे तक्रार: उपविभागीय अभियंता (यांत्रिकी) मानकर करतात नियमबाह्य कामे
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या यांत्रीकी विभागातील मानकर यांनी ओटा बांधकाम व बोरवेल खोदकाम लघुनळ पाणी पुरवठाव विद्युत मोटार पंप दुरुस्ती व खरेदी मध्ये लाखो रुपयाचे भ्रष्टाचार केलेला आहे. गाव टंचाई योजनेमध्ये मनमर्जीप्रमाणे कामे वाटप करुन बोगस देयक तयार करुन बिल काढले आहे. मानकर नियमबाह्य काम करीत असल्यामुळे खा. नाना पटोले यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली आहे.
ओटा बांधकाम व बोरवेल खोदकाम लघुनळ पाणी पुरवठा व विद्युत मोटार पंप दुरुस्ती व खरेदीमध्ये लाखो रुपयाचे भ्रष्टाचार केला आहे. सन २०१५-१६, २०१६-१७ मध्ये नवीन हातपंप व दुरुस्ती योजना, देखभाल दुरुस्ती, टीएसपी, आमदार, खासदार व राज्यसभा सदस्य यांनी सुचविलेल्या गाव टंचाई योजनेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर कामे न करता आपल्या जवळच्या लोकांना मनमर्जीप्रमाणे कामे वाटप करुन बोगस देयक तयार करुन बिल काढत असल्याचा आरोप मानकर यांच्यावर करण्यात आला आहे. ई-निविदा मध्ये वित्त अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची दिशाभूल करुन सर्वात कमी दरपत्रक असलेल्यांना काम न देता आपल्या मर्जीतील लोकांना काम दिले आहे. सर्व कंत्राटदाराला समान कामे न देता आपल्या मर्जीतील लोकांना कमो देवून शासन नियमाचे उल्लघंन व शासन रक्कमेची अफरातफर केली आहे. जि.प. मध्ये माझे कुणीही काही बिघडवू शकत नाही अशा प्रकारची भाषेचा वापर करीत असतात. या प्रकरणी स्वतंत्र चौकशी करुन कारवाई करण्याचे पत्र खा. पटोले यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहे.