जेएसव्हीने घातला कोट्यवधीने गंडा

By admin | Published: March 11, 2017 12:12 AM2017-03-11T00:12:34+5:302017-03-11T00:13:08+5:30

येथे जेएसव्ही नावाने कंपनी स्थापन करुन आरडी, एफडीच्या नावावर लोकांकडून पैसे वसूल करणाऱ्या संचालक मंडळाने

Millions of dollars spent by JSW | जेएसव्हीने घातला कोट्यवधीने गंडा

जेएसव्हीने घातला कोट्यवधीने गंडा

Next

सात जणांवर गुन्हा : २०१० पासून पैसे वसुली
गोंदिया : येथे जेएसव्ही नावाने कंपनी स्थापन करुन आरडी, एफडीच्या नावावर लोकांकडून पैसे वसूल करणाऱ्या संचालक मंडळाने कोट्यवधी रुपयांनी अनेक लोकांना गंडा घालून त्यांची फसवणूक केली आहे. परंतु या संदर्भात प्रथमदर्शनी प्राप्त तक्रारीत ४० लाखाने फसवणूक झाल्याचे पुढे आले आहे. अजून अनेक लोकांच्या तक्रारी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गंगाझरी येथील प्रकाश पतीराम उईकर (६५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जेएसव्ही इंडिया लिमीटेड कंपनीने रेलटोली येथे इको बँकेच्या वर २०१० पासून आपली शाखा उघडली. रिझर्व बँकेकडून कोणत्याच प्रकारची नोंदणी अथवा परवानगी न घेता त्यांनी लोकांकडून पैसे घेण्याचा सपाटा सुरु केला. आरडी व एफडीच्या नावावर सहयोगी एजंटांमार्फत उईकर यांच्याकडून ४० लाख रुपये त्यांनी घेतले. अशाच पद्धतीने अनेक लोकांचे पैसे या कंपनीने गडप केले.
लोकांची मॅच्युरीटी आल्यावरही त्यांना मॅच्युरीटी देण्यात येत नसल्याने अनेक पोलिसात धाव घेण्याची तयार केली. यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसात ९ मार्च रोजी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. यात जेएसव्ही डेव्हलपर इंडिया लिमीटेडचे व्यवस्थापकीय संचालक जगमोहन पटये रा.कांचननगर खजुरी, भोपाळ, जय विनायक, फिल्ड कॉर्पोरेशन लिमिटेड, साई मंदिर समोर वर्धा रोड नागपूर, विजयालक्ष्मी कठये, पुलभासिंग राणा (६७) भोपाळ, संचालक भुपेंद्रसिंग कठये रा. खजुरी भोपाळ, दिनेश हेमराज टेंभरे रा.लांजी रोड आमगाव, संध्या ईश्वर आंबेडारे, लोकवानी चौक देशबंधू वार्ड भंडारा या सात जणांवर गुन्हे दाखल केले.
 

Web Title: Millions of dollars spent by JSW

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.