पतसंस्थेच्या ठेवीदारांचे लाखो रुपये थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:36 AM2021-07-07T04:36:11+5:302021-07-07T04:36:11+5:30
साखरीटोला : येथील आदर्श महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था सातगाव (भजेपार) र.न. १०७८ येथील संचालक, नित्यनिधी गोळा करणारे ...
साखरीटोला : येथील आदर्श महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था सातगाव (भजेपार) र.न. १०७८ येथील संचालक, नित्यनिधी गोळा करणारे कर्मचारी यांनी खातेदाराच्या लक्षावधी रुपयांच्या जमा निधीचा गैरवापर करून आर्थिक अफरातफर व फसवणूक केल्याचा आरोप करीत याची दुय्यम उपनिबंधक सालेकसा, पोलीस स्टेशन यांच्याकडे तक्रार केली. मात्र, याची अद्यापही चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे पतसंस्थेच्या ठेवीदारांचे लाखो रुपये बँकेत थकले आहेत.
पतसंस्थेतील अध्यक्ष उपाध्यक्ष, सचिव व नित्यनिधीची रक्कम गोळा करणारे एजंट व गाव परिसरातील अत्यंत जवळचे असल्याने ठेवीदारांनी मोठ्या आशेने रोजच्या कमाईतून भविष्याची तजवीज म्हणून ठेवी ठेवल्या होत्या. अनेकांनी आयुष्यभर बचत करून रक्कम फिक्स डिपॉजिट करून ठेवली. मात्र, ज्यावेळी गरजेसाठी ठेवलेले पैसे काढण्याची वेळ आली. त्यावेळी या संस्थेने पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. आजही शेकडो ठेवीदार आपल्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी वणवण करत फिरत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ठेवीदारांनी केली आहे.
050721\59111740-img-20210705-wa0009.jpg
पतसंस्था