खुल्या मैदानावर लावले लाखोंचे क्रीडा साहित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 11:49 PM2017-11-01T23:49:42+5:302017-11-01T23:49:53+5:30
नगर परिषद महिला व बाल कल्याण विभागातर्फे शहरातील खुल्या मैदानावर क्रीडा साहित्य लावण्यात आले. मैदानावर येणाºया लहान मुलांना खेळण्याचे साहित्य उपलब्ध व्हावे, हा यामागील उद्देश होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : नगर परिषद महिला व बाल कल्याण विभागातर्फे शहरातील खुल्या मैदानावर क्रीडा साहित्य लावण्यात आले. मैदानावर येणाºया लहान मुलांना खेळण्याचे साहित्य उपलब्ध व्हावे, हा यामागील उद्देश होता. मात्र खुल्या मैदानावर लावले लाखो रुपयांचे क्रीडा साहित्य अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची आहे. पण यापासून नगर परिषदचे कर्मचारी अनभिज्ञ असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मुलांना खेळण्याचे साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी नगर परिषद महिला बालकल्याण विभागाने सन २०१३ मध्ये शहरातील विविध १४ ठिकाणी क्रीडा साहित्य लावण्याचे आर्डर दिले होते. तत्कालीन नगरसेवकांच्या मागणीवरुन लहान बालकांसाठी खेळणे आणि क्रीडा साहित्य लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र नगर परिषदेच्या संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी क्रीडा साहित्य मागविल्यानंतर ते कोणकोणत्या ठिकाणी लावायचे याचे नियोजन केले नाही. त्यासाठी जागा सुध्दा निश्चित केल्या नाही.
साहित्य येऊन पडल्याने अखेर ते शहरातील खुल्या मैदानावर लावण्यात आले. यानंतर या साहित्यांच्या देखभाल दुरूस्तीकडे कर्मचाºयांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे बºयाच मैदानावर लावलेले क्रीडा साहित्य चोरीला गेल्याची माहिती आहे. क्रीडा साहित्य लावण्याचे कंत्राट अंजली फायब्रोटेक्स, एसके फायब्रोटेक्स व चंचल आॅफसेट यांना देण्यात आले होते.
एकूण चार ठिकाणी हे साहित्य लावण्यात आले होते. अजंली फायब्रोटेक्स ला ९३ हजार ६०० रुपये, एसके फायब्रोटेक्सला १ लाख ७५ हजार ६८० रुपये, चंचल आॅफसेटला १ लाख २९ हजार २४० रुपयांच्या साहित्याचे आर्डर दिले होेते. दोन वर्षांपर्यंत हे साहित्य लावण्याचे काम सुरू होते.
शहरात एकूण १४ ठिकाणी हे क्रीडा साहित्य लावण्यात येणार होते. मात्र सामान्य फडांत निधी नसल्याने निधी उपलब्धतेनुसार हे काम करण्यात आले.
मैदानावर साहित्य लावल्यानंतर त्यांच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी या विभागाची होती. मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने काही मैदानावरील साहित्य चोरीला गेल्याचे चित्र आहे. तर काही ठिकाणच्या साहित्यांची दुरवस्था झाली असून त्यांचा उपयोग कपडे वाळविण्यासाठी केला जात आहे.
नियम बसविले धाब्यावर
ज्या ठिकाणी बालोद्यान असेल त्या ठिकाणी लहान मुलांसाठी क्रीडा साहित्य लावले जाते. मात्र नगर परिषद महिला व बाल कल्याण विभागाने त्यांच्या मनमर्जीनुसार इतर ठिकाणी साहित्य लावले. जिथे हे क्रीडा साहित्य लावण्यात आले, त्यात गणेशनगर प्राथमिक शाळा, सिंधी स्कूलच्या मागे हरीकाशीनगर, प्राथमिक शाळा रामनगर, रेल्वे वार्ड, आंबेडकर वार्ड समाज भवन, गोवर्धन चौक छोटा गोंदिया, कृष्णपुरा वार्ड दर्गा, कव्वाली मैदान, संजयनगर, बिरजू चौक रामनगर, रावजीभाई समाजवाडी रामनगर, इंजिन शेड, चावडी चौक छोटा गोंदिया, मालवीय शाळा मैदान आदी जागांचा समावेश आहे.
हे काम माझ्या कार्यकाळातील नाही. मात्र नगर परिषदेचे क्रीडा साहित्य चोरीला जाणे ही गंभीर बाब आहे. याची संबंधित अधिकाºयांकडून माहिती घेतो. तसेच यातील दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल.
- अशोक इंगळे,
नगराध्यक्ष गोंदिया नगर परिषद.