धान केंद्रावर शेतकऱ्यांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 09:48 PM2019-06-21T21:48:10+5:302019-06-21T21:48:39+5:30

गोरेगाव तालुक्यातील शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. प्रती क्विंटल मागे धान कपात करण्याऐवजी प्रती कट्टयामागे धान कपात करुन लूट केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

The misguided farmers at the grain center | धान केंद्रावर शेतकऱ्यांची दिशाभूल

धान केंद्रावर शेतकऱ्यांची दिशाभूल

Next
ठळक मुद्देप्रती कट्टयामागे धानाची कपात : हमालीचे पैसे शेतकऱ्यांकडूनच, मार्केटिंग फेडरेशनचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
मुरदोली : गोरेगाव तालुक्यातील शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. प्रती क्विंटल मागे धान कपात करण्याऐवजी प्रती कट्टयामागे धान कपात करुन लूट केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
गोरेगाव तालुक्यातील नेहरु राईस मिल केंद्रावर दिलीप मेश्राम या शेतकऱ्यांनी धान विक्रीस नेले.मात्र केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी धानाचा केंद्रावर काटा न करता केवळ २१ क्विंटल धान धर्मकाट्यावर मोजण्याकरिता पाठविले. धानाचे वजन केल्यानंतर प्रती कट्टयामागे दीड किलो धान कपात केले. त्यामुळे सदर शेतकऱ्याने यावर आक्षेप घेत कपात केलेले २२ किलो धान्य परत देण्याची मागणी केली. यावरुन शेतकरी आणि केंद्रावरील कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर सदर शेतकऱ्याला कपात केलेले २२ किलो धान परत करण्यात आले. विशेष म्हणजे धान खरेदी केंद्रावर आधी येणाऱ्या शेतकऱ्याचा धानाचा काटा न करता दलाला मार्फत येणाऱ्यांचा धानाचा काटा आधी केला जातो. खरेदी केंद्रावर धान पोहचविण्याची जबाबदारी शेतकऱ्याची आहे. यानंतर त्याचे वजन करुन धान ठेवण्याची जबाबदारी केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या हमालांची आहे.
यासाठी त्यांना शासनाकडून प्रती क्विंटल मागे हमाली दिली जाते. पण यानंतर सुध्दा खरेदी केंद्रावर प्रती क्विंटल मागे ७ ते ८ रुपये हमाली घेतली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. असाच प्रकार जिल्ह्यातील बहुतेक धान खरेदी केंद्रावर सुरू असून याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकराची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

एक क्विंटल धानावर २ किलो धान कपात केली जाते.धानाचे वजन करण्याचे पैसे शेतकऱ्यांकडून घेणे नियमबाह्य आहे. यासंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यास कारवाही करण्यात येईल.
- जी.टी.खर्चे, जिल्हा मार्केटींग फेडरेशन अधिकारी, गोंदिया.

Web Title: The misguided farmers at the grain center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.