महागाव धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:30 AM2018-12-01T00:30:46+5:302018-12-01T00:33:02+5:30

तालुक्यातील महागाव सिरोली येथील आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्रावर सर्रास नियमांचे उल्लंघन करुन शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जात असल्याची तक्रार खरेदी विक्री समितीचे माजी संचालक यशवंत परशुरामकर यांनी केली आहे.

Misguided farmers at the Mahagaon Paddy Purchase Center | महागाव धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची दिशाभूल

महागाव धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची दिशाभूल

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांचा आरोप : साध्या वनजकाट्याने मोजमाप

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील महागाव सिरोली येथील आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्रावर सर्रास नियमांचे उल्लंघन करुन शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जात असल्याची तक्रार खरेदी विक्री समितीचे माजी संचालक यशवंत परशुरामकर यांनी केली आहे.
तालुक्यात खरीप हंगामाचे धानपीक निघाले. शासकीय हमी भावाने धान खरेदी करण्याचा तिढा कसाबसा सुटला आधारभूत हमी भावाने धान खरेदी सुरु झाली. मात्र नियोजनशून्य कार्यप्रणालीमुळे बारदाणा नसल्यामुळे अनेकदा खरेदी केंद्र बंद पडत आहेत. उसणवारी करुन दिवाळीचा सण साजरा करणाऱ्या शेतकºयांना धानविक्री करुन उसणवारीची परतफेड करावयाची आहे.
मात्र बारदान्याच्या अभावामुळे खरेदी केंद्र बंद पडण्याच्या प्रक्रियेमुळे अडचणी येत आहेत. महागाव येथील धान खरेदी केंद्रावर चक्क साध्या वजन काट्याने मोजमाप केले जात आहे. इलेक्ट्रॉनिक वजन काट्याला वारंवार चार्र्जींग करावी लागते.
या सबबीखाली चक्क शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा आरोप परशुरामकर यांनी केला आहे. साध्या वजनकाट्याने बारदाण्याचे वजन व झुकते माप घेवून एक क्विंटल मागे साधारणत: २ ते ३ किलोची लूट केली जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. या हंगामाची जेव्हापासून खरेदी सुरु झाली अगदी तेव्हापासूनच साध्या वजनकाट्यावर मोजमाप सुरु आहे. खरीप हंगामाचे काही शेतकऱ्यांचे धान निघाले नसतानाही त्यांनी खरेदी केंद्रावर विक्रीसाठी रजिस्टरमध्ये नोंदणीकरुन ठेवली आहे.
याची ज्या शेतकऱ्यांना जाणीव नाही ते शेतकरी धानपिक निघाल्यानंतर धान खरेदी केंद्रावर पोहचत आहेत. त्यामुळे खरेदी केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची भल्ली मोठी वेटिंग लिस्ट तयार झाली आहे. यातच खरेदी विक्री संघ व ग्रेडरच्या नजीकच्या शेतकऱ्यांच्या धानाचे मोजमाप केले जात असल्याचाही आरोप आहे. महागाव परिसरातील २५ टक्के धान खरेदी झालेली नाही. दिवसभरात केवळ ४ ते ५ शेतकऱ्यांच्या धानाचे वजन काटा केला जातो. मात्र वेटिंग लिस्ट फार मोठी आहे. अद्याप ७५ टक्के शेतकरी धान खरेदी केंद्रावर आले नाहीत. त्यामुळे एकापेक्षा अधिक वजन काट्यांची आवश्यकता आहे.
शिवाय ते सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स हवेत असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.ज्या प्रमाणात शेतकऱ्यांची वेटिंग लिस्ट आहे. त्या प्रमाणात धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी धान आणून ठेवले नाहीत. त्यामुळे यातील गुपीत उलगडले नाही. दुसऱ्या वजनकाट्याने धान खरेदी सुरू केली नाही तर धान खरेदी केंद्रच बंद पाडण्याचा इशारा यशवंत परशुरामकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या तक्रारीतून दिला आहे.

Web Title: Misguided farmers at the Mahagaon Paddy Purchase Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.