कृषी विभागाकडून शासनाची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 11:54 PM2017-09-09T23:54:06+5:302017-09-09T23:54:23+5:30

दहा दिवसांपूर्वी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाºयांनी पावसाअभावी जिल्ह्यातील ७० हजार हेक्टर जमीन पडिक असल्याची माहिती दिली होती.

Mismanagement of the Agriculture Department | कृषी विभागाकडून शासनाची दिशाभूल

कृषी विभागाकडून शासनाची दिशाभूल

Next
ठळक मुद्देशेतकºयांमध्ये संताप : जिल्ह्यात ७८ टक्के रोवणी झाल्याचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : दहा दिवसांपूर्वी पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाºयांनी पावसाअभावी जिल्ह्यातील ७० हजार हेक्टर जमीन पडिक असल्याची माहिती दिली होती. मात्र आता यावरुन घुमजाव करीत जिल्ह्यात आत्तापर्यंत ७८ रोवण्या झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कृषी विभागाकडूनच प्रशासनाची दिशाभूल केली जात असल्याचे चित्र आहे.
यंदा आत्तापर्यंत सरासरीच्या केवळ ५४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यातही सातत्याने नसल्याने धानापिकांना त्याचा फटका बसला. आॅगस्ट महिन्यापासून पाऊस झालेल्या केलेली रोवणी देखील वाळत आहे. तलाव, बोड्या व धरणांमध्ये देखील अत्यल्प पाणीसाठा आहे. एकंदरीत पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. मात्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने जिल्हाभरात आवत्यांसह ७८ टक्के रोवण्या झाल्याची नोंद केली आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस पडला असताना मोठ्या प्रमाणात शेतकºयांनी रोवणी केलीच नाही. मग कृषी विभागाने ७८ टक्के रोवणीची नोंद घेतलीच कशी? असा सवाल शेतकºयांकडून केला जात आहे.
जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ७८ हजार २२९ हेक्टर असून प्रत्यक्ष पेरणी एक लाख ३९ हजार ८७०.२० हेक्टरमध्ये करण्यात आली. यात रोवणी एक लाख ३० हजार ५७४.२० हेक्टरमध्ये तर आवत्या ९ हजार २९६ हेक्टरमध्ये असल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून दमदार पाऊस झालेला नाही. मग कृषी विभागाने रोवणीची एवढी नोंद केली कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने दुष्काळी परिस्थितीबाबत रोवणी न झालेल्या शेतजमिनीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश कृषी विभागाला दिले होते. मात्र अद्यापही कृषी विभागाला अद्यापही सर्वेक्षणाला सुरूवात केली नसल्याची माहिती आहे. यासंदर्भात कृषी विभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती देणे टाळले.
आतापर्यंत ७१०.२० मिमी पावसाची नोंद
सद्यस्थितीत जिल्ह्यातील पर्जन्यमानाची स्थितीसुद्धा वाईटच आहे. जिल्ह्यात १ जून ते ८ सप्टेंबर २०१७ पर्यंत एकूण सरासरी ७१०.२० मिमी पाऊस झाला आहे. यात गोंदिया तालुक्यात सरासरी ७७० मिमी पाऊस, गोरेगाव ७४५.२० मिमी, तिरोडा ६७९.९ मिमी, अर्जुनी-मोरगाव ९५४.२० मिमी, देवरी ५०६.८० मिमी, आमगाव ७९७.१० मिमी, सालेकसा ६९० मिमी व सडक-अर्जुनी तालुक्यात सरासरी ५३१.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
धरणामंध्ये अत्यल्प साठा
सद्यस्थितीत जिल्ह्यातील नदीनाले व तलावही आटले आहेत. काही मोठ्या धरणांमध्येही पाण्याचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे यावर्षी सर्वत्र दुष्काळाचे असल्याचे चित्र आहे. सध्या इटियाडोह धरणाला १९०.२३ दलघमी जलसाठा आहे. शिरपूर धरणात २७.२३ दलघमी, पुजारीटोला धरणात १९.९२ दलघमी, कालीसराडमध्ये ५.७६ दलघमी, संजय सरोवरमध्ये २५०.१३ दलघमी जलसाठा आहे. तसेच देवरी येथे वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी ०.६२ मीटर व रजेगाव येथे वाघ नदीतील पाण्याची पातळी ०.९५ मीटर आहे. पाटबंधारे विभागानुसार, धोक्याची पातळी २७७.३० मीटरच्या वर असताना सद्यस्थितीत असलेली पाण्याची पातळी खूपच अत्यल्प आहे.
गेल्या ३५ वर्षांत प्रथमच धरणाच्या पातळीत घट
यंदा जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ५४ टक्केच पावसाची नोंद झाली. परिणामी धरणांमध्ये देखील अत्यल्प पाणीसाठा आहे. सिंचन विभागाने दिलेल्या माहितीनुसार १९८२ नंतर म्हणजे ३५ वर्षांनी धरणाची पातळी ऐवढी खालावली असल्याचे सांगितले.

Web Title: Mismanagement of the Agriculture Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.