सातबाºयातून नाव केली गहाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 09:40 PM2017-09-08T21:40:27+5:302017-09-08T21:40:41+5:30

बनावट वारसा पत्राच्या आधारे सातबारावरील वारसांची नावे गहाळ करुन ४ हजार ८०० वृक्षांची कत्तल केल्याचा प्रकार अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाराभाटी येथे उघडकीस आला.

Missing name from seventh place | सातबाºयातून नाव केली गहाळ

सातबाºयातून नाव केली गहाळ

Next
ठळक मुद्देविना परवानगीने ४८०० वृक्षांची कत्तल: माहितीच्या अधिकारामुळे फुटले बिंग

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : बनावट वारसा पत्राच्या आधारे सातबारावरील वारसांची नावे गहाळ करुन ४ हजार ८०० वृक्षांची कत्तल केल्याचा प्रकार अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बाराभाटी येथे उघडकीस आला. दरम्यान तक्रारीवरुन यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूरच्या काटोल रोड वरील अमन प्राइड येथील रहिवासी जावेद परवेज खान शहरवार (५२) यांनी अर्जुनी मोरगाव पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांचे वडील शहरवार अली खान सेनेत नोकरी करीत होते. त्यांना सरकारकडून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या बाराभाटी येथे भूमापन सर्वे क्र. १५/३ मध्ये ३.२४ हेक्टर आर शेतजमीन शासनाने दिली होती. साकोली तहसील कार्यालय आदेश क्र. १५/७/अ/१९६६-६७ अनुसार १६ सप्टेंबर १९६६ ला जमिनीचा ताबा देण्यात आला. त्यावेळी त्या जमिनीवर झाडे होती. ते नागपूर येथे खासगी नोकरीत व्यस्त असल्यामुळे ते या शेतीकडे लक्ष देऊ शकले नाही. १८ फेब्रुवारी २००८ ला त्यांचा मृत्यू झाला. नोकरी सोडल्यानंतर मे २०१६ मध्ये त.सा.क्र.१५/३ जमीनीच्या संदर्भात तलाठ्यासंदर्भात विचारणा केल्यावर या गटाचा शाहेद फरवेज खान हा एकटाच मालक असल्याचे सांगितले. यासंदर्भात फेरफार, ७-अ/१२ मध्ये नाव असल्याचे सांगितले.
जावेद परवेज खान आपली पत्नी सादिया खान (४७), मोठा मुलगा फुरखान अली (२५) व लहान मुलगा वजाहत अली खान (१७) सोबत नागपूर येथे वास्तव्यास आहेत. वडील शहरवार अली खान यांचे निधन १८ फेब्रुवारी २००८ ला तर आईचे निधन वडिलांच्या पूर्वीच झाल्याचे सांगितले. जावेद परवेज खान, मोठा भाऊ शाहेद परवेज खान व लहान बहीन फरहीन खान शहरवार अली खान हे तीन बहीण-भाऊ आहेत. परंतु त्यांना विश्वासात न घेता शाहेद परवेज खान याने स्वत:ला एकटाच वारस असल्याचे दाखवून फेरफारमध्ये नाव नोंदविले. खोटे कागदपत्र तयार करून विश्वासघात केला. या प्रकरणात अर्जुनी मोरगाव पोलिसांनी शाहेद परवेज खान यांच्याविरूध्द भादंविच्या कलम ४२०,४६८,४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

अधिकार नसताना नगरसेविकेने दिले वारसा प्रमाणपत्र
वारसा प्रमाणपत्र एफिडेव्हिट च्या आधारे दंडाधिकारी देऊ शकतात. नगरसेवक वारसा प्रमाणपत्र देऊ शकत नाही. परंतु शाहेद परवेज खान यांना १३ फेब्रुवारी २०१० ला नागपूरच्या वार्ड क्र. १७ च्या तत्कालीन नगरसेविकेने त्याला एकटाच वारसा असल्याचे प्रमाणपत्र दिले. जावेद परवेज खान यांना प्रमाणपत्र, फेरफारमध्ये चढविण्यात आलेली नावे, झाडे या संदर्भात माहीत माहितीच्या अधिकारातंर्गत पुढे आली आहे.
महसूल विभागाची भूमिका संशयास्पद
नगरसेविकेकडून वारसा प्रमाणपत्र घेतल्यानंतर शाहेद परवेज खान यांनी २३ फेब्रुवारी २०१० ला बाराभाटी येथील तलाठ्याकडे फेरफार नोंदणी व सातबारावर नाव चढविण्यासाठी अर्ज केले. तलाठ्याने तपासणी न करताच नोटीस काढले व सातबारावर नाव चढविले. या संदर्भात माहिती झाल्यावर जावेद खान यांनी माहितीच्या आधारे माहिती घेतली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात नगरसेविका, महसूल विभाग व वन विभागाची भूमिका संशयास्पद आहे.

४८०० वृक्षांची कत्तल
गाव नमुना सात नुसार ३.२५ हेक्टर जमीनीचे विविध प्रकारचे १ हजार ४३४ झाडे आहेत. जावेद परवेज खान यांच्या मते त्या जमीनीवर ४ हजार ८०० झाडे हेती. ते सर्व कापण्यात आले. महसूल विभागाने नोंदविलेले झाडे कापण्यात आले आहे. या विभागाकडून गाव नमुना सात वर १ हजार ४३४ झाडे कसे दाखविले हे न सुटणारे कोडे आहे.

Web Title: Missing name from seventh place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.