बँक खात्यातील दोन लाख रुपये गहाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:18 AM2018-12-20T00:18:08+5:302018-12-20T00:18:57+5:30
गोरेगाव येथील को-आपरेटिव्ह बँकेतून गोरेगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक गेंदलाल जीवनलाल बिसेन यांच्या खात्यातून दोन लाख रूपये विड्रॉल झाले आहेत. बँकेचे कुठलेही व्यवहार केले नसतांना त्यांच्या खात्यातून पैसे गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोरेगाव येथील को-आपरेटिव्ह बँकेतून गोरेगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक गेंदलाल जीवनलाल बिसेन यांच्या खात्यातून दोन लाख रूपये विड्रॉल झाले आहेत. बँकेचे कुठलेही व्यवहार केले नसतांना त्यांच्या खात्यातून पैसे गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गोरेगाव येथील सेवानिवृत्त शिक्षक गेंदलाल जीवनलाल बिसेन यांचे खाते गोरेगाव येथील को-आपरेटिव्ह बँकेच्या शाखेत आहे. २९ नोव्हेंबरला त्यांच्या खात्यात २ लाख ८ हजार १७९ रूपये होते. त्याचदिवशी त्यांनी ८००० रु पये एटीएमने विड्राल केले. बँकेत २ लाख १७९ रूपये शिल्लक होते. त्यानंतर कोणतेही व्यवहार केले नाही.
१४ डिसेंबरला त्यांची पेंशन २३ हजार ४४२ रूपये जमा चे ७०६६११३३६७ या मोबाइल वर एसएमएस आला. परंतु शिल्लक फक्त २३ हजार ८२६ दाखविले. यावर बँकेशी संपर्क साधला असता १० डिसेंबरला १३ ट्रांजेक्शनद्वारे १ लाख ९५ हजार व ११ डिसेंबरला ४ हजार ५०० रूपये असे एकूण १ लाख ९९ हजार ५०० कमी झाल्याचे कळले. या विड्राल सदंर्भात त्यांना कुणाचा फोन किंवा कोणतेही संदेश आले नाही.
यावरून बँकेकडुन आपल्या रक्कमेची कोणतीही सुरक्षा नाही असे सांगत गेंदलाल जीवनलाल बिसेन यांनी बँकेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शाखा व्यवस्थापकाला दिलेल्या निवेदनातून केली आहे.