एसटी महामंडळाच्या पैशाचा गैरवापर

By admin | Published: June 19, 2015 01:21 AM2015-06-19T01:21:21+5:302015-06-19T01:21:21+5:30

स्थानिक आगारातील कार्यशाळा अधीक्षक तागडे यांनी रा.प.महामंडळाच्या पैशाची अफरातफर

Misuse of money by ST corporation | एसटी महामंडळाच्या पैशाचा गैरवापर

एसटी महामंडळाच्या पैशाचा गैरवापर

Next

कामगार संघटनेची तक्रार : कार्यशाळा अधीक्षकावर आरोप
तिरोडा : स्थानिक आगारातील कार्यशाळा अधीक्षक तागडे यांनी रा.प.महामंडळाच्या पैशाची अफरातफर करून गैरवापर केल्याबाबतची तक्रार महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना भंडारा विभागाच्या वतीने आगार व्यवस्थापक रा.प.तिरोडा यांना करण्यात आलेली आहे.
तक्रारीनुसार, तागडे यांनी १३ फेब्रुवारी २०१५ ला सामान खरेदीकरिता चिट बनवून स्वत: १५० रूपये घेतले. मात्र सामान खरेदी न करता नगदी पैसे २६ फेब्रुवारी २०१५ रोजी कॅशमध्ये जमा केले. तसेच दि. २२ एप्रिल २०१५ रोजी ५०० रूपये घेऊन सामान खरेदी न करता १७ मे २०१५ रोजी नगदी कॅशमध्ये जमा केले.
तिरोडा आगारातील वाहक भत्ताने (बिल्ला-१५८०) हे शेडूल क्रमांक २५/२६ ची कामगिरी पार पाडत असताना साकोली बसस्थानकावर स्वत:च्या हाताने चिट बनवून त्याच्याकडून ५०० रूपये घेतले. तागडे यांची साप्ताहिक सुटी असताना त्यांनी सामान खरेदीच्या नावावर पैसे कसे काय घेतले व पैसे घेऊन सामान खरेदी न करता आपला स्वगावी निघून गेले. तिरोडा आगारात ३ मे २०१५ रोजी सामानाकरिता एकही वाहन उभे नव्हते. तागडे यांनी सदर वाहकाला (भत्ताने बिल्ला -१५८०) चिट दिली असता त्यामध्ये ३ मे २०१५ असे नमूद केले आहे. सदर वाहकास कॅशचा हिशेब देताना खूप मानसिक त्रास झाला. सबंधित अधिकारी याबाबत कोणती कार्यवाही करतात याकडे आगारातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Misuse of money by ST corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.