संपूर्ण निधीचा होतोय गैरवापर
By admin | Published: March 30, 2017 01:12 AM2017-03-30T01:12:33+5:302017-03-30T01:12:33+5:30
केंद्र व राज्य शासनाद्वारे ग्रामीण भागाच्या क्षेत्रीय विकास व सामान्य नागरिकांच्या वैयक्तिक लाभाच्या शेकडो योजना शासन राबवित आहे.
गोपालदास अग्रवाल : पशुधन विकासातील भ्रष्टाचार थांबवा!
गोंदिया : केंद्र व राज्य शासनाद्वारे ग्रामीण भागाच्या क्षेत्रीय विकास व सामान्य नागरिकांच्या वैयक्तिक लाभाच्या शेकडो योजना शासन राबवित आहे. परंतु आजसुद्धा सामान्य नागरिक मागासलेलाच आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सामान्य नागरिकांना योजनांबाबत माहिती नसणे व योजना राबविणाऱ्या जि.प. व पं.स. यासारख्या संस्थांमध्ये भ्रष्टाचार व्याप्त असणे हे आहे, असे प्रतिपादन आ. गोपालदास अग्रवाल यांनी केले.
गोंदिया पंचायत समितीची वार्षिक आमसभा पंचायत समितीच्या जयस्तंभ चौकातील नवनिर्मित सभागृृहात पार पडली. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या वेळी तालुक्यात कृषी, पंचायत, शिक्षण, पशुसंवर्धण, बांधकाम, महिला सशक्तीकरण व बालविकास, विद्युत मंडळ, पोलीस तहसील कार्यालय, अन्न व नागरी पुरवठा याबाबत तालुक्यात सुरू असलेले कार्य तथा नागरिकांच्या समस्या यावर चर्चा झाली.
आ. अग्रवाल पुढे म्हणाले, पशुसंवर्धण कृषी विभागाद्वारे पशुधनाच्या विकासासाठी पशुपालकांना नि:शुल्क गाय-बैल, बैलगाडी व कृषी औजारे देण्याची योजना अनेक वर्षांपासून सुरू आहे. परंतु पशुधनाचा विकास दिसत नाही. ज्या लाभार्थ्यांच्या नावे लाखो रूपयांचे पशुधन वितरित करण्यात आला, त्यांनासुद्धा सदर योजनेबाबत काहीही माहिती नाही. न कोणते पशुधन उपलब्ध आहे. शासनाच्या निधीचा गैरवापर होत आहे. गरिबांच्या घरकुलांच्या धनादेशासाठी लाच घेताना याच पंचायत समितीच्या महिला कर्मचाऱ्यास रंगेहात लाच लुचपत विभाग पकडतो. त्यामुळे कुठेतरी प्रशासनाची बदनामी होतच आहे. परंतु सामान्य नागरिकांचा त्राससुद्धा समोर येतो. गोंदिया तालुक्यात हे सर्व चालणार नाही. यात सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी मिळून सुधारणा घडवून आणावी लागेल, अन्यथा कठोर कारवाईसाठी सर्वांनी तयार रहावे, असे उद्गार व्यक्त करीत आ. अग्रवाल यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी प्रामुख्याने पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती पी.जी. कटरे, महिला व बालकल्याण सभापती विमल नागपुरे, जि.प. पक्षनेते रमेश अंबुले, माजी जि.प. अध्यक्ष रजनी नागपुरे, माजी सभापती स्रेहा गौतम, प्रकाश रहमतकर, सरिता अंबुले, लक्ष्मी रहांगडाले, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, माजी उपसभापती चमन बिसेन, मनिष मेश्राम, खंडविकास अधिकारी इस्कापे, पोलीस निरीक्षक शुक्ला, वन अधिकरी मेश्राम, जि.प. सदस्य विजय लोणारे, शेखर पटेल, विठोबा लिल्हारे, सीमा मडावी, पं.स. सदस्य अनिल मते, विनिता टेंभरे, निता पटले, प्रतिमा करचाल, माधुरी हरिणखेडे, प्रकाश डहाट, चमन बिसेन, जयप्रकाश बिसेन, प्रिया रंजित मेश्राम, सारंग भेलावे, हरिचंद कावळे, इंद्रानी धावडे, योगराज उपराडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.