आमदारांनी घेतले डव्वा गाव दत्तक
By Admin | Published: December 30, 2015 02:20 AM2015-12-30T02:20:19+5:302015-12-30T02:20:19+5:30
महाराष्ट्र शासनाच्या आमदार आदर्श गाव योजनेअंतर्गत आमदार राजेंद्र जैन यांनी सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा (पळसगाव) या गावाची निवड केली आहे.
आमदार आदर्श ग्राम योजना : गावात आनंदाचे वातावरण
गोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या आमदार आदर्श गाव योजनेअंतर्गत आमदार राजेंद्र जैन यांनी सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा (पळसगाव) या गावाची निवड केली आहे. डव्वा गाव दत्तक घेतल्याने शासनाच्या संपूर्ण योजना या गावात राबविल्या जाणार आहेत. त्यामुळे या गावातील नागरिकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ८ आॅक्टोबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील प्रत्येक विधानसभा व विधान परिषद क्षेत्रातील एक ग्राम पंचायत आदर्श ग्राम योजनेत घेऊन त्यागावात शासनाच्या विविध योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार आमदार जैन यांनी सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा या गावाची आमदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत निवड केली आहे. त्यामुळे या गावात शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या सर्वच योजना राबविल्या जाणार आहेत. लवकरच त्याचा कृती आराखडा तयार करून शासनाला सादर करण्यात येणार आहे.
आमदार जैन यांनी डव्वा गावाची निवड केल्याने जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, सरपंच शारदा किरसान, उपसरपंच मंदा चौधरी, ग्राम पंचायत सदस्य भोजु गुरनुले, कामिनी गोस्वामी, पुष्पमाला बडोले, शालिंद्र कापगते, श्याम येवले, चुन्नीलाल कोसरे, राकेश जैन, मुन्ना अग्रवाल, रुपविलास कुरसुंगे, सिंधू नेवारे, इनामभाई, निलु येवले, सूर्यभान उंदीरवाडे, रामचंद्र देशमुख,राजेश उंदीरवाडे, देवनाथ वाघाडे, प्रमोद कुरसुंगे, नाशिक बंसोड, हिरालाल राऊत, डॉ. सोहन चौधरी, गिरीश गाते, नेकचंद बडोले, लुकेश येळे, व्यंकट प्रधान, सतीश महाराज याशिवाय संपूर्ण डव्वावासीयांनी त्यांचे कौतूक केले आहे. (शहर प्रतिनिधी)