शाळाबाह्य बालक शोध मोहिमेत आमदारांचा सहभाग ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:30 AM2021-03-17T04:30:07+5:302021-03-17T04:30:07+5:30
नंदीबैल घेऊन घरोघरी जाऊन त्यांच्या माध्यमातून उदरनिर्वाह करणारे काही कुटुंब तिरोडा परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्यासोबत ३ ते १८ ...
नंदीबैल घेऊन घरोघरी जाऊन त्यांच्या माध्यमातून उदरनिर्वाह करणारे काही कुटुंब तिरोडा परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्यासोबत ३ ते १८ वयोगटातील बालकेदेखील होती. त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांच्या कुटुंबाची व कार्याची सखोल माहिती आमदार रहांगडाले यांनी घेतली. ही बालके कुटुंबासह दोन-तीन दिवसांपासून तिरोडा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा परिसरात वास्तव्यास असून, नागपूर जिल्ह्यातून पारशिवनी गावावरून आल्याचे सांगितले. यात इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सहा बालकांचा समावेश होता. त्यांना आ. विजय रहांगडाले यांनी लगतच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाळा तिरोडा येथे दाखल करण्यास सांगितले. ही सर्व सहा बालके आपल्या आई-वडिलांकडे जाऊन आम्हाला शाळेत जायचे, असा आग्रह धरला. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने शोधमाेहीम सुरू केली असून, ती महत्त्वपूर्ण ठरत आहे. यासाठी गटशिक्षणाधिकारी एम. डी. पारधी, गटसमन्वयक ब्रजेश डी. मिश्रा, देविदास हरडे, प्रागकुमार एस. ठाकरे, उमाकांत पी. पारधी व नीलिमा टेंभरे हे सहकार्य करीत आहेत.