पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात मनसेची सायकल रॅली ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:36 AM2021-02-25T04:36:22+5:302021-02-25T04:36:22+5:30
गोंदिया : मागील तीन-चार महिन्यांपासून सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंगळवारी शहरातील मनसे कार्यालय ते ...
गोंदिया : मागील तीन-चार महिन्यांपासून सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंगळवारी शहरातील मनसे कार्यालय ते तहसील कार्यालयापर्यंत ‘सायकल रॅली’ काढून निषेध नोंदविला. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करण्याच्या मागणीचे निवेदन पंतप्रधानांच्या नावे तहसीलदारांना देण्यात आले.
मंगळवारी सकाळी ११ वाजता स्थानिक मनसे कार्यालयापासून सायकल रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर ही रॅली जयस्तंभ चौकातून तहसील कार्यालयात पोहोचली. या रॅलीच्या माध्यमातून पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरची दरवाढ केल्यामुळे केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. कोरोना काळ सुरू असताना व यापूर्वी तीन महिने कडक लाॅकडाऊन केल्यामुळे तसेच अनलाॅक झाल्यावर सामान्य जनता जेमतेम आपआपल्या रोजी-रोटीच्या व्यवस्थेत कशीबशी लागली आहे. आपला व्यवसाय किंवा नोकरीच्या पोटापाण्याकरिता लागताच केंद्र सरकारने इंधन दरवाढ केल्यामुळे अन्य उपजीविकेच्या वस्तूंचे दर वाढले असल्यामुळे सामान्य जनता बेहाल झाली आहे. त्यामुळे मनसेने सायकल रॅली काढून निषेध नोंदविला. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरची दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. शिष्टमंडळात जिल्हा उपाध्यक्ष मुकेश कुमार मिश्रा, तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे, राजेश नागोसे, क्षितिज वैद्य, कारंजा शाखा अध्यक्ष रोहित उके, आर्चिश बोरकर, अनिकेत रंगारी, संदीप राहुलकर व मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.