अंगणवाडी सेविकांचे मोबाइल वापस आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:34 AM2021-08-25T04:34:34+5:302021-08-25T04:34:34+5:30
गोरेगाव : कुठलेही प्रशिक्षण न देता अंगणवाडी सेविकांना मोबाइल देऊन त्यात इंग्रजीत माहिती भरणे अनिवार्य केले आहे. माेबाइलदेखील बरोबर ...
गोरेगाव : कुठलेही प्रशिक्षण न देता अंगणवाडी सेविकांना मोबाइल देऊन त्यात इंग्रजीत माहिती भरणे अनिवार्य केले आहे. माेबाइलदेखील बरोबर चालत नसून त्याच्या दुरुस्तीसाठी अंगणवाडी सेविकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. तर वेळेत माहिती भरली नाही म्हणून त्यांचा पगार कपात केला जात आहे. याविरोधात मंगळवारी (दि.२४) अंगणवाडी सेविकांनी येथील बाल विकास प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढून मोबाइल परत केले.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक गोरेगाव तालुकाद्वारे मंगळवारी मोर्चा काढून मोबाइल वापस आंदोलन करण्यात आले. बालविकास विभागाने निकृष्ट दर्जाचे मोबाइल वाटप केल्याच्या घोषणा या वेळी दिल्या. तसेच विविध मागण्यांचे निवेदन प्रकल्प अधिकारी चव्हाण यांना देण्यात आले. या वेळी सर्व अंगणवाडी सेविकांनी मोबाइल वापस केले. मोर्चाचे नेतृत्व हौसलाल रहांगडाले, राज्य उपाध्यक्ष वीणा गौतम, जिल्हा उपाध्यक्ष पुष्पा ठाकूर, तालुका अध्यक्ष अंजना ठाकरे, तालुका सचिव भुमेश्वरी रहांगडाले, निवृत्ती मेश्राम, उपाध्यक्ष यशोदा पटले, कार्याध्यक्ष लक्ष्मी फरदे, आयटकचे चरणदास भावे, रत्नमाला गेडाम, लता तुरकर, ओमेशवरी हरीणखेडे यांनी केले. यात तालुक्यातील अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.