मोबाईलवरच सभापती व नगरसेवकात जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 09:51 PM2018-05-10T21:51:54+5:302018-05-10T21:51:54+5:30

पाण्याच्या टँकरची पावती फाडण्यावरून कॉँग्रेस पक्षाचे नगरसेवक व नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती यांच्यात मोबाईलवरच जुंपली. यात सभापतींनी फक्त पावती फाडण्यास म्हटले असल्याचे सांगीतले.

On the mobile, in the chairmanship of the councilor and the corporator | मोबाईलवरच सभापती व नगरसेवकात जुंपली

मोबाईलवरच सभापती व नगरसेवकात जुंपली

Next
ठळक मुद्देशहरात पाणी पेटले : पावती फाडण्यावरून बाचाबाची

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पाण्याच्या टँकरची पावती फाडण्यावरून कॉँग्रेस पक्षाचे नगरसेवक व नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती यांच्यात मोबाईलवरच जुंपली. यात सभापतींनी फक्त पावती फाडण्यास म्हटले असल्याचे सांगीतले. तर नगरसेवकाने आम्हालाच पावती कशाची असा मुद्दा उपस्थित केल्याने वाद झाल्याची माहिती आहे.
शहरात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून लग्नघरात पाण्याची सोय व्हावी म्हणून नगर परिषदेच्या टँकरने पाण्याची व्यवस्था केली जात आहे. यासाठी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून शहरवासीयांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
यासाठी किमान २५० रुपयांचे शुल्क आकारले जाते. यातच बुधवारी (दि.९) नगरसेवक भागवत मेश्राम यांनी त्यांच्या प्रभागातील रहिवासी एका नागरिकाच्या घरातील लग्न सोहळ््यानिमित्त पाण्याच्या टँकरची मागणी केली. त्यांच्या मागणीवरून सभापती बोबडे यांनी पूर्वीच चार टँकर पाठविल्याची माहिती आहे. तर नगरसेवक मेश्राम यांनी सभापती बोबडे यांना मोबाईलवर संपर्क साधून दुपारी पुन्हा एका टँकरची मागणी केली.
यावर सभापती बोबडे यांनी पाचवा टँकर जात असल्याने किमान एका टँकरची तरी पावती फाडण्याबाबत नगरसेवक मेश्राम यांना सांगितले. यावर मेश्राम यांनी नगरसेवकांना कशाचे पैसे आणि आमच्याच प्रभागासाठी पैसे लागत आहेत काय असे म्हटले व येथूनच दोघांमध्ये वाद वाढला.
दरम्यान हे प्रकरण, बांधकाम सभापती शकील मंसूरी यांच्यापर्यंत गेले. त्यांच्या मध्यस्तीने सभापती बोबडे यांनी टँकर पाठविला. याबाबत सभापती बोबडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, पाचवा टँकर जात असल्याने एक तरी पावती फाडली जावी या उद्देशातून बोललो. मात्र मेश्राम यांनी विषयांतर करून वाद घातल्याचे सांगीतले.
नगरसेवक मेश्राम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, अन्यत्र नि:शुल्क टँकर पाठविले जातात मग आम्ही नगरसेवक असूनही त्यांनी आम्हाला पैसे मागीतल्याचे सांगितले.
घरातील वाद आला चव्हाट्यावर
नगर परिषद सदस्यांचे आपसांतले हे प्रकरण मात्र फेसबूकवर टाकण्यात आले आहे. यातून नगर परिषद सदस्यांचा आपसातील वाद चव्हाट्यावर आला आहे. सध्या तो एक चर्चेचा विषय झाला आहे. परिषद सदस्यच आता एकमेकांचा राग फेसबूकवर टाकून व्यक्त करीत असल्याने आता घरातील वाद चव्हाट्यावर आल्याच्या प्रतिक्रीयाही उमटू लागल्या आहेत.

Web Title: On the mobile, in the chairmanship of the councilor and the corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.