पांढरी येथे मोबाइल सेवा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:19 AM2021-06-27T04:19:52+5:302021-06-27T04:19:52+5:30

मुंडीकोटा येथील बँकेत असुविधा मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथील आयडीबीआय बँकेला परिसरातील १५ गावे जोडलेली आहेत. या बँकेत ...

Mobile service disrupted at Pandhari | पांढरी येथे मोबाइल सेवा विस्कळीत

पांढरी येथे मोबाइल सेवा विस्कळीत

Next

मुंडीकोटा येथील बँकेत असुविधा

मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथील आयडीबीआय बँकेला परिसरातील १५ गावे जोडलेली आहेत. या बँकेत चढ-उतार करताना वृद्ध नागरिकांना त्रास होतो. पार्किंगची व्यवस्था नसल्यानेही अडचण होत आहे.

ऑनलाइन खरेदीला आला जोर

देवरी : शहरापासून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत ऑनलाइन वस्तू खरेदीला कोरोनामुळे जास्त महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसत आहे. पैशांची बचत होत असल्याने नागरिक आता ऑनलाइन वस्तू खरेदी करत आहेत.

वृक्षतोडीनंतर वृक्षांची सर्रास वाहतूक

सडक-अर्जुनी : शेतशिवारासह जंगलात असलेल्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू झाली आहे. अनेकदा अशी वृक्षतोड करताना वनविभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे.

रानडुकरांचा हैदोस कोण थांबविणार?

अर्जुनी-मोरगाव : या परिसरातील शेतकरी पिकासाठी राबराब राबून व दिवस-रात्र काबाडकष्ट करून घाम गाळतात. मात्र, रानडुकरे शेतात शिरून पिकांची नासाडी करत आहेत.

महिलांना जनधनच्या मानधनाची प्रतीक्षा

गोरेगाव : गरीब महिलांना आर्थिक बळ म्हणून केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिलांच्या जनधन बचत खात्यात अनुदान जमा केले होते. मात्र, आता अनुदान जमा झालेले नाही.

कव्हरेजअभावी भ्रमणध्वनी सेवा ठप्प

बोंडगावदेवी : शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात भ्रमणध्वनी ग्राहक आहेत. मात्र, मागील अनेक दिवसांपासून कव्हरेजची समस्या निर्माण झालेली आहे.

मुख्यालयी राहण्याची सक्ती करा

गोंदिया : ग्रामीण भागात सेवा देणारे तलाठी व ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने शेतकरी व नागरिकांना विविध कामासाठी तालुक्याला यावे लागत आहे. कोरोनाच्या काळात तलाठी व ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने मजुरांचे विलगीकरण तसेच शेतकऱ्यांची काम करणे आदी सेवांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करावे, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागात कार्यरत तलाठी व ग्रामसेवक तालुका मुख्यालयात राहून एरवी अप-डाऊन करतात. परंतु सध्या प्रशासनाने गठीत केलेल्या कोरोनाच्या गाव समितीत या कर्मचाऱ्यांचा समावेश असतानाही ते मुख्यालयाला दांडी मारत आहेत. विशेष म्हणजे, खरीप हंगामाला काही दिवसातच सुरुवात होणार आहे. सध्या पीक कर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. शेतकऱ्यांना सातबारा व अन्य कागदपत्रे द्यावी लागतात. अशा स्थितीत कार्यालयात हजर राहणे आवश्यक आहे. परंतु हे कर्मचारी उपस्थित राहत नाही.

डिझेलच्या दरवाढीने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

केशोरी : केंद्र सरकारने डिझेलचे भाव वाढविल्यामुळे सर्व क्षेत्रांसह शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. विदर्भातील गोंदिया, भंडारा या दोन जिल्ह्यांमध्ये धानपिकासह इतरही पिकांचे उत्पन्न घेण्यासाठी वर्षभर शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीची मशागत करतात. शेतीच्या मशागतीसाठी वापरात येणारे महत्त्वाचे साधन म्हणजे ट्रॅक्टर होय; पण आता महागाईमुळे ट्रॅक्टरद्वारे मशागत करणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Web Title: Mobile service disrupted at Pandhari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.