मोबाईल चोर रेसुबच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 09:48 PM2018-05-29T21:48:44+5:302018-05-29T21:48:55+5:30
येथील रेल्वे स्थानकाच्या प्रतीक्षालयात विश्राम करीत असलेल्या युवकाचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. त्या युवकाने सदर चोरीची तक्रार रेल्वे सुरक्षा बलाला केली. सीआयबी स्पेशल टास्क टीम व रेल्वे सुरक्षा दलाने त्वरित शोध घेवून मोबाईल चोरास पकडले. त्याच्या दोन सहकार्यांना अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील रेल्वे स्थानकाच्या प्रतीक्षालयात विश्राम करीत असलेल्या युवकाचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. त्या युवकाने सदर चोरीची तक्रार रेल्वे सुरक्षा बलाला केली. सीआयबी स्पेशल टास्क टीम व रेल्वे सुरक्षा दलाने त्वरित शोध घेवून मोबाईल चोरास पकडले. त्याच्या दोन सहकार्यांना अटक केली.
दपूम रेल्वे नागपूर रेल्वे सुरक्षा बलाचे मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे व सहायक सुरक्षा आयुक्त ए.के.स्वामी यांच्या मार्गदर्शनात, सीआयबीचे प्रभारी निरीक्षक एस.दत्ता व रेल्वे सुरक्षा दलाचे प्रभारी निरीक्षक किरण एस. यांच्या नेतृत्वात सीआयबी उपनिरीक्षक एस.एस.बघेल, प्रधान आरक्षक आर.सी.कटरे, स्पेशल टास्क टीम गोंदियाचे उपनिरीक्षक विवेक मेश्राम, प्रधान आरक्षक जी. आर. भंडारी, आरक्षक पी.एस.पटेल हे गोंदिया रेल्वे स्थानकात वाढलेल्या प्रवासी सामानाच्या चोरींवर आळा घालण्यासाठी व आरोपींना पकडण्यासाठी बारीक नजर ठेवून होते. दरम्यान सकाळी ६.३० वाजता एक प्रवासी संतोष दिलीप चांदेकर (२०) रा. मुकाम, कोरंभी, आंबेडकर वार्ड जि. भंडारा आपला भाऊ शुभम चांदेकर यांच्यासह भंडाऱ्याला जाण्यासाठी मेन गेटसमोर प्रवासी प्रतीक्षालयात विश्राम करीत होते. दरम्यान अज्ञात इसमाने त्याचा सात हजार रूपये किमतीचा मोबाईल चोरला. त्याने सदर प्रकरण टास्क टीमला सांगितले.
उपनिरीक्षक विनेक मेश्राम, एस.एस.बघेल यांनी टीमला सोबत घेवून त्वरित कारवाई करण्यासाठी रवाना झाले.आजुबाजूला झोपलेल्या सर्व लोकांची वेशभूषा पाहली. तसेच फिर्यादीला घेवून रेल्वे स्थानक व इतर संशयास्पद ठिकाणी आरोपींचा शोध घेतला. दरम्यान फिर्यादीने वर्णन केलेल्या वेशभूषेप्रमाणे एक व्यक्ती रेल्वे स्थानकाच्या प्रतीक्षालयात संशयास्पदरित्या प्रवेश करताना आढळला. त्याची चौकशी केल्यावर त्याने आपले नाव हिरदेश सुरेंद्र नेताम (२२) रा.गौशाला वार्ड, पाणी टाकीजवळ गोंदिया असे सांगितले. त्याला फिर्यादीच्या मोबाईलबाबत विचारण्यात आल्यावर तोे घाबरला व उडवाउडवीची उत्तरे दिली. फिर्यादीने त्यावर संशय व्यक्त केल्याने रेल्वे सुरक्षा दलाने त्याला रेसुबच्या कार्यालयात नेले. त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने सांगितले की, तो आपल्या इतर दोन सोनू व कासिक या दोन सहकार्यासह रेल्वे स्थानकात रात्री योजना बनवून चोरी करण्याच्या उद्देशाने आले. सोनू पहारा देत होता. तर काशिम व हिरदेश यांना चोरीसाठी रेल्वे स्थानक परिसरात पाठविण्यात आले. तेव्हा हिरदेस व काशिम दोघेही प्रवाशांच्या मधात मुख्य गेटसमोर झोपले.
दरम्यान एका प्रवाशाचा मोबाईल चोरून हिरदासने कासिमला दिला व तो दुसºया चोरीसाठी स्थानकात राहिला. तसेच त्याचे दोन्ही सोबती मोबाईल घेवून पळून गेल्याचे व त्या दोघांचे वर्णन व ठिकाणही पोलिसांना सांगितले. यानंतर फिर्यादी व पकडलेला आरोपी यांना सोबत घेवून फरार दोन आरोपींच्या शोधासाठी गेले. रेल्वे स्थानक व संशयास्पद ठिकाणांचा शोध घेण्यात आला. दरम्यान ८.३० वाजता दोन व्यक्ती स्थानकासमोर उत्तर दिशेच्या क्षेत्रातच त्याचे दोघे सोबती संशयास्पद स्थितीत आढळले. आरोपीने त्यांना ओळखून सोनू व कासिम असल्याचे सांगितले. टीमद्वारे सापळा रचून दोघांना घेरून पकडण्यात आले. चौकशी केल्यावर त्यांनी आपली नावे सोनू उर्फ सोनू परदेशी गोपाल चव्हाण (३३) व कासिम जिब्राईल शेख (२२) दोन्ही रा. गौशाला वार्ड, पाणी टाकीजवळ, गोंदिया असे सांगितले. त्यांची तपासणी केल्यावर सोनूजवळ चोरीला गेलेला आयबॉल कंपनीचा मोबाईल आढळला. फिर्यादीने तो मोबाईल पाहताच तो आपल्या असल्याचे सांगितले. चोरी केल्याचे सिध्द झाल्यावर मोबाईलसह सर्व आरोपींना योग्य कायदेशीर कार्यवाहीसाठी सीआयबी रेल्वे सुरक्षा दलाने शासकीय रेल्वे पोलिसांच्या सुपूर्द केले. भादंविच्या कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.