मोबाईलने घालविली मेमरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:20 AM2021-07-08T04:20:09+5:302021-07-08T04:20:09+5:30

...........असे का होते.... - प्रत्येक व्यक्तीच्या मेेंदूमध्ये शाॅर्ट मेमरी असते, या मेमरीचा वापर करुन लॉग टाईम मेमरी तयार होते. ...

Mobile wasted memory! | मोबाईलने घालविली मेमरी!

मोबाईलने घालविली मेमरी!

Next

...........असे का होते....

- प्रत्येक व्यक्तीच्या मेेंदूमध्ये शाॅर्ट मेमरी असते, या मेमरीचा वापर करुन लॉग टाईम मेमरी तयार होते.

- मोबाईल आणि रेडिमेडमुळे शार्ट मेमरीचा वापर होणेच बंद झाले आहे. त्यामुळे रिकॉल होत नाही.

- याच सर्व कारणामुळे एखाद्या व्यक्तीचा नंबर लक्षात राहत नाही. त्यामुळे आपल्या दुसऱ्यावर विसंबून राहण्याची सवय लागते.

..........हे टाळण्यासाठी काय केले पाहिजे...

-आपण दिवसभरात केलेल्या कामाचा आढावा दररोज रात्री घेतला पाहिजे.

- मोबाईल अथवा कॉम्प्युटरचा अधिक वापर करणे टाळले पाहिजे.

- कामात मन लागण्यासाठी अथवा एकाग्रता वाढविण्यासाठी ध्यान लावला पाहिजे. आपल्या बुद्धीचा अधिक वापर केला पाहिजे.

........मुलांना ,आजोबाला नंबर्स पाठ कारण.....

आजोबा

माझा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. मला मोबाईलचे फारसे काम पडत नाही. मोबाईल म्हणजे विनाकारणचा खर्च आहे. ज्या व्यक्तींना बोलायचे त्यांना प्रत्यक्ष जाऊन बोलतो. त्यामुळे मला माेबाईलची गरज भासत नाही.

........

आई

घरची संपूर्ण जबाबदारी माझ्यावरच आली आहे. रोज मजुरी करुन मी काम करते. माझा मोबाईल बंद पडला आहे. पण मला अनेकांचे नंबर मुखपाठ आहेत. मोबाईल न वापरण्याचा हा फायदाच आहे.

...........

लहान मुलगी

मी सातव्या वर्गात शिक्षण घेत आहे. ग्रामीण भागात ऑफलाइन शिक्षण पद्धती शाळेचा अभ्यास करीत आहे.त्यामुळे मोबाईलचे काम पडले नाही; मात्र मला अनेक नंबर लक्षात आहेत. त्यावरुन मला संपर्क साधता येतो.

.............

कोट

प्रत्येक व्यक्तीला आपली मेमरी अधिक तल्लख ठेवायची असेल आणि ती अधिक पॉवर फुल करायची असेल तर दररोज आपल्या मेमरीला रिकॉल करणे गरजेचे आहे. त्यामुळे मोबाईलसह रेडिमेडचा वापर टाळणे गरजेचे आहे.

- डॉ. लोकेश चिरवतकर,मानसोपचार तज्ज्ञ

..........

Web Title: Mobile wasted memory!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.