मोडा सडवा व दारूचा बंपर साठा जप्त ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:27 AM2021-09-13T04:27:19+5:302021-09-13T04:27:19+5:30
तिरोडा : ऑपरेशन वॉश आऊट अंतर्गत तिरोडा पोलिसांनी आपल्या हद्दीत ठिकठिकाणी धाडसत्र राबवून १६ अवैध दारू विक्रेत्यांना दणका दिला ...
तिरोडा : ऑपरेशन वॉश आऊट अंतर्गत तिरोडा पोलिसांनी आपल्या हद्दीत ठिकठिकाणी धाडसत्र राबवून १६ अवैध दारू विक्रेत्यांना दणका दिला आहे. विशेष म्हणजे, या धाडसत्रात पोलिसांनी मोहा सडवा व दारूचा बंपर १२ लाख ६४ हजार ४२० रुपयांचा साठा जप्त केला आहे. शनिवारी पोलिसांनी (दि.११) राबविलेल्या या धाडसत्रानंतर मात्र परिसरात एकच खळबळ माजली आहे. या धाडसत्रात पोलिसांनी अनिल कुवारदास बिंझाडे (रा. संत रविदास वॉर्ड, तिरोडा) याच्या जमुनिया जंगल परिसरातील अड्ड्यावर धाड घालून ४५ हजार रुपये किमतीचा ४५० किलो मोहा सडवा, सुखावंता बाबुराव बरीयेकर (रा. संत रविदास वॉर्ड) हिच्या घरातून ४५ हजार रुपये किमतीचा ४५० किलो सडवा, कलीम गफूर पठाण (रा.संत रविदास वॉर्ड) याच्या घरातून ५६ हजार रुपये किमतीचा ७०० किलो सडवा, पूर्णाबाई प्रल्हाद तांडेकर (रा. संत रविदास वॉर्ड) हिच्या घरातून ३५ हजार २०० रुपये किमतीचा ४४० किलो सडवा, साबीर रहीमखा पठाण (रा. संत रविदास वॉर्ड) याच्या घरातून ४० हजार रुपये किमतीचा ५०० किलो सडवा, तोशिफ सलीम पठाण (रा.संत रविदास वॉर्ड) याच्या घरातून २७ हजार २०० रुपये किमतीचा ३४० किलो सडवा, गोपी अनिल कुंभारे (रा. काचेवानी) याच्या अदानी पावर प्लांटच्या पाठीमागील झुडपी जंगल परिसरातील अड्ड्यावर धाड घालून ७३ हजार ६०९ रुपये किमतीचा ९२० किलो सडवा जप्त केला.
तसेच चंद्रशेखर देवराव टेेंभेकर (रा. कोडेलोहारा) याच्या जंगल परिसरातील अड्ड्यावर धाड घालून १९ हजार ७०० रुपये किमतीचा २४० किलो सडवा, विजय दामाजी उके (रा. सुकडी) याच्या घरातून दोन हजार रुपये किमतीची मोहाची २० लिटर दारू, रवी भैय्यालाल कुंभारे (रा. काचेवानी) याच्या घरातून पाच हजार रुपये किमतीची मोहाची ५० लिटर, मारुती नरसय्या बंडीवर (रा. लाखेगाव) याच्या घरातून पाच हजार रुपये किमतीची मोहाची ५० लिटर दारू, तरासनबाई अशोक बरियेकर (रा. संत रविदास वॉर्ड) याच्या घरातून ७० हजार ५२० रुपये किमतीचा ८६० किलो सडवा, कविता सेवकराम तांडेकर (रा. संत रविदास वॉर्ड) हिच्या घरातून २८ हजार ८०० रुपये किमतीचा ३६० किलो सडवा, शिला विनोद खरोले (रा. संत रविदास वॉर्ड) हिच्या घरातून १७ हजार ६०० रुपये किमतीचा २२० किलो सडवा, अमीन शफी शेख (रा. संत रविदास वॉर्ड) याच्या पुजारीटोला जंगलातील अड्ड्यावर धाड घालून तीन लाख ५२ हजार रुपये किमतीचा ४४०० किलो सडवा तर श्यामराव श्रीराम झाडे (रा. संत रविदास वॉर्ड) याच्या पुजारीटोला जंगलातील अड्ड्यावर धाड घालून दारू गाळण्याचे साहित्य, ५३६० किलो सडवा व मोहाची १०० लिटर दारू असा चार लाख ४१ हजार ८०० रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी धाड घातलेल्या या १६ अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
-----------------------------------
संत रविदास वॉर्ड हेच हॉटस्पॉट
पोलिसांनी केलेल्या कारवाईत १६ पैकी ११ अवैध दारू विक्रेते तिरोडा शहरातील संत रविदास वॉर्डातील आहेत. याशिवाय, पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या धाडसत्रांमध्ये बहुतांश दारू विक्रेते संत रविदास वॉर्डातीलच असतात असे दिसून येते. यावरून संत रविदास वॉर्ड हे दारू विक्रीचे हॉटस्पॉट असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. अशात पोलिसांनी काही कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे.