पोलिसांची ॲक्शन मोड ठरली बाधितांच्या वाढीवर ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:27 AM2021-05-22T04:27:29+5:302021-05-22T04:27:29+5:30

केशोरी : येथे एप्रिल महिन्यापासून झालेला कोरोना संसर्गाचा विस्फोट आता आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ...

The mode of action of the police was to break the growth of the victims | पोलिसांची ॲक्शन मोड ठरली बाधितांच्या वाढीवर ब्रेक

पोलिसांची ॲक्शन मोड ठरली बाधितांच्या वाढीवर ब्रेक

Next

केशोरी : येथे एप्रिल महिन्यापासून झालेला कोरोना संसर्गाचा विस्फोट आता आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ग्रामपंचायतीने राबविलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांच्या ॲक्शन मोडमुळे कोरोना बाधितांच्या वाढणाऱ्या संख्येवर ब्रेक लागला आहे. १५ मे नंतर कोरोना रुग्ण संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे.

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी येथे एप्रिल महिन्यात कोरोना संसर्गाच्या रुग्णांत फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. याची तालुका प्रशासनाने दखल घेऊन कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला. लॉकडाऊन कालावधीत कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यासाठी सरपंच नंदू पाटील-गहाणे यांच्या मार्गदर्शनात गावातील अत्यावश्यक सेवेच्या दुकानांसह भाजीपाला दुकाने बंद ठेवून गावात पूर्णत: आवागमन बंद करण्यात आले. प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी ठाणेदार संदीप इंगळे यांच्या मार्गदर्शनात चौका-चौकांत पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त कोरोनाचा संसर्ग रोखण्यास कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. येथे कोणत्याही रुग्णाने घराबाहेर पडू नये आणि इतर घरच्या लोकांनी बाधित रुग्णांपासून कसे वेगळे राहावे, याची घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात आली. एवढेच नव्हे, तर पोलिसांनी गावात विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर प्रतिबंध घातल्यामुळे कोरोनाच्या वाढीवर ब्रेक लागला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Web Title: The mode of action of the police was to break the growth of the victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.