मोदी सरकारने विविध योजना राबवून सर्वसामान्यांना थेट लाभ दिला ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:22 AM2021-06-04T04:22:25+5:302021-06-04T04:22:25+5:30
गोंदिया : सन २०१४ मध्ये देशातील जनतेने लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत देऊन देशाचा कारभार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हाती ...
गोंदिया : सन २०१४ मध्ये देशातील जनतेने लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत देऊन देशाचा कारभार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हाती दिला. त्यामुळे देशाच्या प्रगतीला एक नवी गती मिळाली. देशातील राम मंदिराचा कित्येक वर्षांपासून प्रलंबित वाद मोदी सरकारने सोडविला. तर लोकहितार्थ विविध योजना राबवून सर्वसामान्य जनतेला थेट लाभान्वित केल्याचे प्रतिपादन माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोदी सरकारच्या ७ वर्षांच्या कार्यकाळाच्या यशस्वी पूर्ततेबद्दल कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त तालुक्यातील ग्राम बिरसोला, सतोना, पांजरा, सिरपूर, काटी, दासगाव, पांढराबोडी, घिवारी, रावणवाडी, खातिया, सावरी, नागरा, रतनारा, ढाकणी, लोधिटोला, कुडवा, कटंगी, आसोली, दतोरा, अदासी, खमारी, फुलचूर, कारंदा, नवेगाव (धा) आयोजित सभेत ते बोलत होते. याप्रसंगी भाजपच्या वतीने आशा सेविकांचाही शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला श्यामदेवी ठाकरे, रामचंद्र कटरे, ओमप्रकाश हरिणखेडे, प्रदीप ठाकरे, रमेश शहारे, गुणवंता कटरे, संदीप असाटी, नरेंद्र तुरकर, डॉ. जमरे, सुधीर ब्राह्मणकर, लक्ष्मीकांत अग्रवाल, डॉ. रहांगडाले, संजय गौतम, श्यामलाल ठाकरे, धुरन सुलाखे, कुसोबा मस्के, मंगल सुलाखे, विनोद बिसेन, राजेश हरिणखेडे, गेंदलाल शरणागत, योगराज रहांगडाले, राजेश नागरीकर, आत्मराम दसरे, नामदेव शहारे, संजू ठाकरे, प्रकाश रहमतकर यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.