भरचौकात मोकाट जनावरांचा वावर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:19 AM2021-06-27T04:19:28+5:302021-06-27T04:19:28+5:30

अर्जुनी मोरगाव : शहरातील मुख्य मार्गावर दिवस-रात्र मोकाट जनावरे बसून असतात. वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. परिणामी मोठा अपघात होण्याची ...

Mokat animals in full swing () | भरचौकात मोकाट जनावरांचा वावर ()

भरचौकात मोकाट जनावरांचा वावर ()

Next

अर्जुनी मोरगाव : शहरातील मुख्य मार्गावर दिवस-रात्र मोकाट जनावरे बसून असतात. वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. परिणामी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. नागरिक आणि वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यापुढे रस्त्यावर मोकाट जनावरे दिसल्यास त्यांच्या मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची भूमिका ठाणेदार महादेव तोदले यांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात घेतली आहे.

अर्जुनी तालुक्याचे ठिकाण आहे. बाजारपेठ, बँक, शासकीय कार्यालयांमध्ये नेहमी वर्दळ असते. मुख्य बाजारपेठ असल्याने मोठ्या वाहनांची ये-जा असते. शहरातील मुख्य मार्ग, रेल्वे गेट, महाराणा प्रताप चौक, वीज वितरण कार्यालय आहे. या मार्गावर १५ ते २० मोकाट जनावरे दिवस-रात्र भटकत असतात. कित्येकदा ही जनावरे तासनतास मुख्य रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून असतात. यामुळे दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अशा परिस्थितीत मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरातील गोपालक जनावरांना मोकाट सोडतात. जनावरांना मोकाट सोडू नये. यापुढे रस्त्यावर ही मोकाट जनावरे आढळून आल्यास त्यांना जप्त करून गोपालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची रोखठोक भूमिका घेतली जाईल, असे ठाणेदार तोदले यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात जाहीर केले आहे. गोपालकांनी जनावरांची सोय करावी; अन्यथा कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

===Photopath===

250621\3420img-20210625-wa0011.jpg

===Caption===

रहदारीच्या मार्गावर भर चौकात असलेली मोकाट जनावरे

Web Title: Mokat animals in full swing ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.