मोकाट जनावरांमुळे वाहतुकीत अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:55 AM2021-03-04T04:55:24+5:302021-03-04T04:55:24+5:30

स्मशान शेड केव्हा तयार करणार मुंडीकोटा : जवळ असलेल्या नवेगाव (खुर्द) येथे बऱ्याच वर्षांपासून स्मशान शेड नाही. त्यामुळे ...

Mokat animals obstruct traffic | मोकाट जनावरांमुळे वाहतुकीत अडथळा

मोकाट जनावरांमुळे वाहतुकीत अडथळा

Next

स्मशान शेड केव्हा तयार करणार

मुंडीकोटा : जवळ असलेल्या नवेगाव (खुर्द) येथे बऱ्याच वर्षांपासून स्मशान शेड नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता

तिरोडा : शहरातील उप मुख्य रस्त्यावर अनेक खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. काही खड्ड्यांमध्ये भरण घालण्यात आले असले तरी ते साहित्य रस्त्यावर पसरले आहे. त्यामुळे रस्ते अरुंद होत आहेत. आवागमनास अडथळा निर्माण होत आहे.

डासांचा प्रादुर्भाव वाढला

गोंदिया : शहरातील नाल्या उपसण्यात न आल्याने कचऱ्याने त्या तुंबल्या आहेत. परिणामी डासांचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यासंबंधी नगर परिषदेकडे निवेदने देण्यात आली. मात्र अद्यापही नाल्या उपसण्यात आल्या नाही.

स्वच्छतेच्या अभावामुळे आजाराला आमंत्रण

गोंदिया : शहरातील विविध ठिकाणी विखुरलेला उघड्यावरील कचरा रोगराईला आमंत्रण देणारा ठरत आहे़ स्वच्छतेच्या अभावामुळे आजाराची शक्यता आणखी वाढत आहे. नगर परिषदेचे दुर्लक्ष आहे़.

उभ्या वाहनांमुळे अपघाताची शक्यता

देवरी : रस्त्याच्या कडेला वाहने उभी राहत असल्याने अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अतिक्रमणाची समस्या वाढली असून रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांमुळे वाहन बाहेर काढणे कठीण होत आहे.

धान्य दुकानदार विमा याेजनेपासून वंचित

गोंदिया : कोरोना संक्रमण महामारीच्या संचारबंदी काळात आर्थिकदृष्ट्या कमकुवत कार्डधारकांना धान्य पुरवठा करण्याचे कर्तव्य बजाविणारे स्वस्त धान्य दुकानदार विमा सुरक्षा कवचापासून वंचित आहेत. कोरोनामुळे स्वस्त धान्य दुकानदारांचा बळी गेला असताना त्यांच्या कुटुंबीयांना अद्यापपर्यंत विम्याचा मोबदला मिळाला नाही. कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य बजाविताना मरण पावलेल्या दुकानदारांच्या कुटुंबीयांची शासनाकडे मदतीची आस लागली आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा रामभरोसे

तिरोडा : ग्रामीण भागातील आरोग्यसेवक, कर्मचारी व केंद्रात नियुक्त शासकीय डॉक्टर मुख्यालयी राहत नसल्याने आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. रुग्णांना सुलभ व जलद सेवा द्यावी हा शासनाचा उदात्त हेतू आहे. मात्र, असे जिल्ह्यात होताना दिसून येत नाही.

आठवडी बाजारात विद्युत व्यवस्था करा

सडक अर्जुनी : येथील गावात आठवडी बाजार भरतो. गावात या रस्त्यावर रहदारी अधिकच असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या रस्त्यावर रात्रीच्या वेळी अंधाराचा सामना करावा लागतो. हा रस्ता सौंदड, पिपरी, कोहमारा या रस्त्याला मार्गक्रम आहे. या रस्त्यावर नेहमी लोकांची वर्दळ असते.

फाईव्ह-जीकडे वाटचाल, मात्र सेवा ‘थ्री जी’तच!

गोंदिया : ॲन्ड्रॉईड मोबाईल हा सध्याच्या काळात जीवनावश्‍यक घटक बनला असून, मोबाईलशिवाय व्यक्ती जगणे कठीणच झाले आहे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. आता पुढे मोबाईलची स्पीड अधिक होणार, अधिक सुविधा मिळणार म्हणजे मोबाईल कंपन्यांची ‘फाईव्ह-जी’कडे वाटचाल सुरू असून, ही सेवा लवकरच सुरू होण्याचे संकेत आहेत. मात्र, सध्या थ्री-जी, फोर-जीची स्पीड व्यवस्थित मिळत नाही. तेव्हा फाईव्ह-जीचे काय? थ्री-जीतच रुतलेले चाक अजूनपर्यंत पुढे जात नाही. ग्राहकांना मोबाईलचे नेटवर्क धड मिळत नाही.

केव्हा तयार होणार प्रमुख रस्ता

केशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्याला जाण्यासाठी प्रमुख मार्ग केशोरी गावाच्या मध्य भागातून जात असल्याने हा रस्ता अत्यंत वर्दळीचा झाला असून धोक्याचा बनला आहे. हा रस्ता अरुंद आणि घरे रस्त्याच्या कडेला लागून असल्याने अनेकदा लहान-मोठे अपघात घडले आहेत. या रस्त्याला पर्याय म्हणून -----६------ बायपास रस्ता अजूनही तयार झाला नाही.

कामगारांची योजना पूर्ववत सुरू करा

गोंदिया : कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबईअंतर्गत इमारत बांधकाम करणाऱ्या गरीब मजुरांना थेट पाच हजार रुपये देण्याची योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी कामगारांकडून होत आहे.

निराधारांचे अनुदान त्वरित द्या

शेंडा कोयलारी : परिसरातील निराधार लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मागील तीन-चार महिन्यापासून खात्यात अनुदान जमा झाले नाही. यामुळे त्यांची आर्थिक कोंडी होत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

तेंदूपत्त्याचा बोनस त्वरित द्या

इसापूर : अर्जुनी-मोर तालुक्यातील ग्राम ईटखेडा येथील फळीवर सन २०१९ मध्ये तेंदूपत्ता नेणाऱ्या लोकांना बोनस अजूनपर्यंत न मिळाल्याने तो त्वरित देण्याची मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.

Web Title: Mokat animals obstruct traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.