तिरोडा शहरात रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:31 AM2021-09-25T04:31:03+5:302021-09-25T04:31:03+5:30
तिरोडा : शहरात सध्या रस्त्यावर मोकाट जनावरांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता ...
तिरोडा : शहरात सध्या रस्त्यावर मोकाट जनावरांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. याची त्वरित दखल घेऊन स्थानिक नगर परिषद प्रशासनाने मोकाट जनावरांच्या मालकांवर कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समाजसेवक मंगेश गेडाम यांनी दिला आहे.
शहरात रस्त्यांवर मोकाट जनावरांचा कळप दिसून येत आहे. जनावरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसलेली असतात. जागा सोडायलाही तयार नसतात अशा वेळी रस्त्याने ये-जा करणारे नागरिक तसेच दुचाकी, तीनचाकी गाडीचालकास मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अपघात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर परिषदेने याकडे लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे.