सरपंच व ग्रामसेवकाचा स्वमर्जीने कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 06:00 AM2019-12-14T06:00:00+5:302019-12-14T06:00:05+5:30

ग्रामपंचायत अंतर्गत होणाऱ्या बांधकामात सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही. बांधकामाबद्दलची कुठलीही माहिती न देता स्वमर्जीने जागा निश्चित करून ले-आऊट दिले जाते. महिला सरपंचाचे पती ग्रामपंचायत कामकाजात हस्तक्षेप करून सदस्यांची मानहानी करतात. ग्रा.पं.च्या मासिक सभेतील उपस्थित सदस्यांच्या स्वाक्षऱ्यांचा उपयोग ठराव संमतीत दर्शवून सरपंच व ग्रामसेवक कामकाज करीत असल्याचा आरोप केला आहे.

Monopoly of Sarpanch and village servant | सरपंच व ग्रामसेवकाचा स्वमर्जीने कारभार

सरपंच व ग्रामसेवकाचा स्वमर्जीने कारभार

Next
ठळक मुद्देसार्वजनिक मालमत्तेची नासधूस : सदस्यांनी केली चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : झरपडा ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक सदस्यांना विश्वासात न घेता स्वमर्जीने कारभार चालवितात.सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. याप्रकरणी चौकशी करण्याचे लेखी पत्र गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
ग्रामपंचायत अंतर्गत होणाऱ्या बांधकामात सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही. बांधकामाबद्दलची कुठलीही माहिती न देता स्वमर्जीने जागा निश्चित करून ले-आऊट दिले जाते. महिला सरपंचाचे पती ग्रामपंचायत कामकाजात हस्तक्षेप करून सदस्यांची मानहानी करतात. ग्रा.पं.च्या मासिक सभेतील उपस्थित सदस्यांच्या स्वाक्षऱ्यांचा उपयोग ठराव संमतीत दर्शवून सरपंच व ग्रामसेवक कामकाज करीत असल्याचा आरोप केला आहे. डेकाटे यांचे घराजवळील लोखंडी टिनाचे पंपशेडची तोडफोड करून मजुरीचे पैसे काढण्यात आले. हे शेड सुस्थितीत होते व यामुळे पाणी भरण्यासाठी येणाऱ्या महिलांचे उन्ह व पावसापासून संरक्षण होत होते.विशेष म्हणजे यासंबंधी मासिकसभेचा ठराव घेण्यात आला नाही.
नवीन ग्रा.पं.इमारत बांधकामासाठी जागा निश्चिती व ले-आऊट देण्याचे काम स्वमर्जीने मासिक सभेत ठराव न घेता करण्यात आले. ग्रामपंचायत रंगरंगोटीचे काम सदस्यांचा विरोध असतांनाही करण्यात आले. यासाठी ग्रामसेवक व सरपंचाने स्वमर्जीने पैसे काढले. आपल्या हिताचे ठराव लिहून पैशाची उचल केली जाते. गतवर्षी अभ्यास दौऱ्यासाठी ५० हजाराचा खर्च आला असतांना ६२ हजार रु पये परस्पर काढण्यात आले.
सरपंचाचे पतीने ग्रा.पं.चे ना हरकत प्रमाणपत्र न घेता आवारभिंतीचे काम केले. शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवडी अंतर्गत उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र ती झाडे लावण्यात आली नाहीत. ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागे अस्ताव्यस्त पडलेली आहेत. सदस्यांनी सभेच्या ठरावाच्या प्रतीची लेखी अर्जाद्वारे मागणी केल्यानंतरही दिली जात नाही. मासिक सभेत अतिक्र मणाविरुद्ध ठराव पारित केल्यानंतरही अतिक्र मणधारकांना प्रोत्साहन दिले जाते. त्यांना कुठलीही नोटीस न बजावता सहकार्य केले जात असल्याचा आरोप उपसरपंच विश्वनाथ खोब्रागडे, अस्मिता मोटघरे, माधुरी नेवारे, नारद शहारे व सुषमा मडावी या सदस्यांनी लेखी तक्रारीतून केला आहे.

आरोप तथ्यहीन - कुंदा डोंगरवार
ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे व वैयक्तिक स्वार्थापोटी केले आहेत. ग्रा.पं.इमारत बांधकामासाठी भूमिपूजन करतांना उपसरपंच स्वत: हजर होते. त्यांनी सुद्धा त्यावेळी कुदळ मारली मग विरोध कशाला? यातून त्यांचा हेतू स्पष्ट होतो. यावर्षी वृक्ष लागवड करायची होती. मात्र वन विभागाच्या वतीने पुरविण्यात आलेली झाडे लहान असल्याने ते वाया जाऊ नयेत यासाठी लावण्यात आली नाहीत. त्यांची आता वाढ झालेली आहे ते लावण्यात येतील. कुठलेही काम स्वहित न जोपासता पारदर्शकपणे करण्यात आली आहेत. सदस्यांना विश्वासात घेऊनच कामे केली आहेत असे सरपंच कुंदा डोंगरवार व ग्रामसेवक साखरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

Web Title: Monopoly of Sarpanch and village servant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sarpanchसरपंच