लोकसंख्यावाढीने बेरोजगारीचे राक्षसी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:18 AM2021-07-12T04:18:50+5:302021-07-12T04:18:50+5:30

विजय मानकर सालेकसा : गोंदिया जिल्ह्यात मागील दहा वर्षांत ८ टक्क्यांनी लोकसंख्यावाढ झाली आहे. या दरम्यान अनेक कुटुंबांची सदस्य ...

The monstrous crisis of unemployment due to population growth | लोकसंख्यावाढीने बेरोजगारीचे राक्षसी संकट

लोकसंख्यावाढीने बेरोजगारीचे राक्षसी संकट

Next

विजय मानकर

सालेकसा : गोंदिया जिल्ह्यात मागील दहा वर्षांत ८ टक्क्यांनी लोकसंख्यावाढ झाली आहे. या दरम्यान अनेक कुटुंबांची सदस्य संख्या दुप्पट ते तिप्पट झाली, परंतु त्यांच्याकडे कृषिभूमी किंवा निवास करण्याची जागा तेवढी राहिली आहे. रोजगाराचे साधनही तेवढेच असून, बेरोजगारीचे संकटही राक्षसाप्रमाणे वाढत चालले आहे. वाढती लोकसंख्या आज सर्वात मोठे चिंतेचे कारण असून, संसाधने मात्र कमी होत चालली आहेत. अशात बेरोजगारीसह इतरही समस्या वाढत आहेत.

सर्वत्र अराजकता मारामारी, चोरी, डाका, दरोडा या सारख्या घटनाही वाढत आहेत. वेळीच प्रभावी उपाययोजना केल्या, तर काही प्रमाणात संभाव्य समस्यांवर नियंत्रण आणता येईल. २०११च्या जनगणनेनुसार गोंदिया जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १३ लाख २२ हजार ५०७ एवढी होती. यात पुरुष ६ लाख ६१ हजार ५५४ आणि महिलांची संख्या ६ लाख ६० हजार ९५३ एवढी होती. ही लोकसंख्या २०२०च्या शेवटपर्यंत १४ लाख ५० हजारांवर पोहोचली आहे. कोरोनाच्या संकटामुळे २०२१चे आकडे तयार झालेले नाही. परिणामी, सध्याच्या स्थितीत जिल्ह्याची नेमकी लोकसंख्या किती हे नेमके सांगता येणार नाही. जिल्ह्यातील ८५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या शेती किंवा शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. एकूण लोकसंख्येतील निम्मे लोक म्हणजे ६ लाख ६० हजारांपेक्षा जास्त लोक निव्वळ मजुरीवर जगत आहेत. या मागील कारण शोधले, तर कृषिभूमी कमी होत चालली व लोकसंख्या वाढत चालली, अशात काही लोकांसाठी कृषिभूमी उरलीच नाही. याला सरळ भाषेत समजून घेणे म्हटल्यास, एका शेतकऱ्याकडे एकूण चार एकर शेती होती. त्याला चार एकर शेती करणे सरासरी परवडणारी असायची, परंतु त्यांची जर चार मुले झाली, तर प्रत्येकाच्या वाट्यात फक्त एकर याप्रमाणे शेतजमीन आली. अशात कोणी भाऊ शेती करायचा, तर कोणी दुसऱ्याला बटई स्वरूपात घ्यायचा आणि स्वत: इतर मजुरीची कामे करून कुटुंबाचा गाडा चालवायचा. पुढे त्यांच्या कुटुंबाची सदस्य संख्या वाढली की, त्यांना मजुरी किंवा इतर मार्ग पत्करून पैसे कमविण्याची वेळ येत गेली.

..............

रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव

गावात रोजगाराअभावी गावातील बेरोजगार लोकांनी शहराकडे धाव घेतली. परिणामी, शहरी लोकसंख्येत वाढ होत आहे. त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचे संकट निर्माण होत गेले. शहरांवर लोकसंख्येचा वाढता भार ही पण एक मोठी समस्या आहे.

............

माल्थसचा सिद्धांत ठरतोय प्रासंगिक

अठराव्या शतकात थॉमस माल्थस यांनी लोकसंख्या वाढीचा सिद्धांत मांडला होता. त्याच्यामते लोकसंख्या ही १,२,४,८ या वेगाने तर संसाधने १,२,३,४ या गतीने वाढतात आणि २५ वर्षांत लोकसंख्या दुप्पट होऊन जाते. मात्र, संसाधन फार कमी वाढतात. वाढत्या लोकसंख्येवर योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.

..........

Web Title: The monstrous crisis of unemployment due to population growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.