निकालासाठी आता महिनाभर धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 05:00 AM2021-12-23T05:00:00+5:302021-12-23T05:00:16+5:30

जिल्हा परिषदेच्या एकूण ५३ तर पंचायत समितीच्या १०६ जागा आहेत. जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी २७ जागांची मॅजिक फिगर गाठावी लागणार आहे. जो पक्ष हा आकडा गाठेल त्याच्यासाठी सत्तेचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र लढले, युती अथवा आघाडी झाली नाही. त्यामुळे मतांचे विभाजन झाले आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत पूर्ण जोर लावला होता.

A month-long push for results | निकालासाठी आता महिनाभर धाकधूक

निकालासाठी आता महिनाभर धाकधूक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया :  स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे या जागा सर्वसाधारण करून १८ जानेवारीला निवडणूक होत आहे. तर मंगळवारी ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून जि.प.च्या ४५, पंचायत समितीच्या ८६ आणि नगरपंचायतच्या ४५ जागांसाठी मतदान घेण्यात आले. मात्र सर्व जागांची मतमोजणी एकाचवेळी म्हणजे १९ जानेवारीला हाेणार आहे. त्यामुळे जवळपास महिनाभर उमेदवारांना निकालासाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याने त्यांची धाकधूक कायम राहणार आहे. 
जिल्हा परिषदेच्या एकूण ५३ तर पंचायत समितीच्या १०६ जागा आहेत. जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी २७ जागांची मॅजिक फिगर गाठावी लागणार आहे. जो पक्ष हा आकडा गाठेल त्याच्यासाठी सत्तेचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र लढले, युती अथवा आघाडी झाली नाही. त्यामुळे मतांचे विभाजन झाले आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या निवडणुकीत पूर्ण जोर लावला होता. तर उमेदवारी देताना काही इच्छुकांना वगळल्याने त्यांनी बंडखोरी करीत निवडणुकीत वेगळी चूल मांडली. तसेच काही अपक्ष उमेदवारांनी आव्हान उभे ठाकले. त्यामुळे याचा काही राजकीय पक्षाच्या उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेसाठी ७० तर पंचायत समितीसाठी ७३.७६ टक्के मतदान झाले. मतदानाची आकडेवारी ही समाधानकारक आहे. जेव्हा जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढली तेव्हा तेव्हा याचा विजयाचा समीकरणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे कोणत्या उमेदवाराचे समीकरण यामुळे बिघडणार हे १९ जानेवारीलाच कळणार आहे. मात्र तोपर्यंत भाऊ कोण चालला आणि हा निघू शकतो, या चर्चांनी उमेदवारांची धाकधूक मात्र निश्चित वाढणार आहे. 

युवा मतदारांचा कल कुणाला? 
- जिल्हा परिषद आणि नगरपंचायतच्या मतदानाची टक्केवारी ही ७० च्या वर आहे. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात युवा मतदारांनीसुद्धा मतदानाचा हक्क बजाविला. युवा मतदार शिक्षित आणि जागरूक असल्याने ते पक्ष पाहून नव्हे, तर उमेदवार पाहून मतदान करतात. त्यामुळे या मतदारांचा कल नेमका कुणाला मिळाला, हेदेखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

लक्ष आता ३० जांगाकडे 
- ओबीसी प्रवर्गाच्या ३० जागा सर्वसाधारण करुन त्यासाठी १८ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे यापैकी अधिकाधिक जागा कशा निवडून आणता येतील, यावर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे लक्ष असणार आहे. त्यामुळे या जागांसाठी ‘काटे की टक्कर’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

Web Title: A month-long push for results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.