डांबरी रस्त्यांना मुरूमाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 10:21 PM2017-09-20T22:21:50+5:302017-09-20T22:22:11+5:30
आमगाव-देवरी मार्गावरील खड्डे मुरूम टाकून बुजविण्याचे काम राष्टÑीय महामार्ग विभागाकडून केले जात आहे. मात्र डांबरी रस्त्यावरील खड्डे मुरुम टाकून बुजविण्याच्या प्रकारामुळे या विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आमगाव-देवरी मार्गावरील खड्डे मुरूम टाकून बुजविण्याचे काम राष्टÑीय महामार्ग विभागाकडून केले जात आहे. मात्र डांबरी रस्त्यावरील खड्डे मुरुम टाकून बुजविण्याच्या प्रकारामुळे या विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
आमगाव- देवरी मार्गावरील खड्डयांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. आठ दहा दिवसांपूर्वीच रस्त्यांवरील खड्यांमुळे दोन जणांना जीव गमवावा लागला. त्यानंतरही अपघाताची मालिका सुरूच आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे या विभागाने दुर्लक्ष केल्याने या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला होता. याचीच दखल राष्टÑीय महामार्ग विभागाने मागील पाच सहा दिवसांपासून रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात केली. डांबरी रस्त्यांवरील खड्डे चुरी आणि डांबराचा वापर करुन बुजविले जातात. मात्र या विभागाने डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी चक्क मुरूमाचा वापर केला. विशेष सर्वच खड्डे मुरूम टाकून बुजविले जात असल्याने नागरिकांनी यावर आश्चर्य व्यक्त केले. डांबरी रस्त्यावरील खड्डे मुरूमाने बुजविण्याच्या प्रकारावर आक्षेप घेतला. मात्र संबंधीत विभागाच्या अधिकाºयांनी त्याला फारसे गांर्भीयाने घेतले नाही. आमगाव-देवरी मार्गावर अजूनही काही ठिकाणी मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान या विभागाच्या अधिकाºयांना यासंदर्भात माहिती विचारली असता त्यांनी माहिती देण्याचे टाळले. विभागाकडून झालेल्या चुकीवर पांघरुन टाकण्याचा प्रयत्न केला.
नियम धाब्यावर
डांबरी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी चुरी आणि डांबराचाच उपयोग केला जातो. शिवाय हे खड्डे चुरी आणि डांबरणाचे बुजविण्याचा नियम आहे. मात्र या विभागाने हे सर्व नियम धाब्यावर बसून शासन आणि नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करित मुरूमाचा वापर करित आहे. या विभागाच्या अजब कारभाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
रस्त्यावरील खड्डे ‘जैसे थे’
आमगाव-देवरी मार्गावरील खड्डे तीन चार दिवसांपूर्वी मुरूम टाकून बुजविण्यात आले. मंगळवारी जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या पावसामुळे खड्डयांमध्ये भरलेले सर्व मुरूम वाहून गेले. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे पुन्हा जैसे थे झाल्याचे चित्र होते.
डांबरी रस्त्यावर चिखल
राष्टÑीय महामार्ग विभागाकडून आमगाव-देवरी मार्गावरील खड्डे मुरूम टाकून बुजविण्यात आले. मात्र पावसामुळे खड्डयांमध्ये भरलेले मुरूम पूर्णपणे वाहून गेले. त्यामुळे डांबरी रस्त्यावरच चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. या मार्गावरुन वाहने काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली.
आमगाव-देवरी हा रस्तापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. मात्र दोन तीन वर्षांपूर्वी या रस्त्याची जबाबदारी राष्टÑीय महामार्ग विभागाकडे सोपविण्यात आली आहे. या रस्त्यांच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी त्याच विभागाचीच आहे.
- बी.आर.वासनिक, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.