अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जि.प.वर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 11:40 PM2019-06-06T23:40:01+5:302019-06-06T23:40:20+5:30

आल इंडिया ट्रेड युनियन (आयटक) च्या नेतृत्त्वात अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात केंद्र सरकारने केलेली वाढ १ आॅक्टोबर २०१८ पासून देण्यात यावी. यासह अन्य मागण्यांना घेवून गुरूवारी (दि.६) स्थानिक जयस्तंभ चौकातून जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

Morcha of Anganwadi workers' district | अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जि.प.वर मोर्चा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जि.प.वर मोर्चा

Next
ठळक मुद्देमानधनात वाढ करण्याची मागणी : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले निवेदन, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आल इंडिया ट्रेड युनियन (आयटक) च्या नेतृत्त्वात अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात केंद्र सरकारने केलेली वाढ १ आॅक्टोबर २०१८ पासून देण्यात यावी. यासह अन्य मागण्यांना घेवून गुरूवारी (दि.६) स्थानिक जयस्तंभ चौकातून जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जि.प.समोर मोर्चा पोहचल्यानंतर अंगणवाडी कर्मचाºयांनी धरणे देऊन विविध मागण्यांचे निवेदन जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी एम.राजा.दयानिधी यांना दिले.
स्थानिक जयस्तंभ चौकात गुरूवारी सकाळी ११ वाजतापासूनच जिल्हाभरातील सर्व अंगणवाडी कर्मचारी एकत्र होण्यास सुरूवात झाली. कडक्याची उन्ह असतांना सुध्दा जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका, मदतनिस, मिनी अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. दुपारी १२ वाजता मोर्चाला सुरुवात झाली त्यानंतर हा मोर्चा जि.प.कार्यालयावर धडकला. जि.प.च्या प्रवेशव्दारासमोर अंगणवाडी कर्मचाºयांनी निदर्शने करुन त्यांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
या वेळी आयटकचे हौसलाल रहांगडाले यांच्या नेतृत्त्वातील शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी एम.राजा.दयानिधी यांना दिले. निवेदनातून अंगणवाडी सेविकांना १५०० रुपये, मिनी अंगणवाडी सेविका १२५० रुपये, मदतनिस ७५० रुपये मानधन वाढ १ आॅक्टोबर २०१८ पासून देण्यात यावे. तसेच प्रोत्साहान भत्ता देण्यात यावा, एक मुस्त पेशंन योजनेतंर्गत सेविका, मदतनिस यांना योजनेचा लाभ देण्यात यावा. १ एप्रिल २०१९ पासून मानधनात ५ टक्के वाढ लागू करण्यात यावी, ती देण्यात यावी. वेळेवर मानधन, प्रवास भत्ता आणि साडीचे थकीत पैसे देण्याची मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात शंकुतला फटिंग,आम्रकला डोंगरे, जिवनकला वैद्य, सुनिता मलगाम, विना गौतम, वच्छला भोगांडे, पुष्पा भगत, बिरजुला तिडके, लालेश्वरी शरणागत, अर्चना मेश्राम, पोर्णिमा चुटे, कांचन शहारे, राजलक्ष्मी हरिणखेडे, विठा पवार, प्रणिता रंगारी, शोभा लेपसे, उर्मिला खोब्रागडे यांचा समावेश होता.
 

Web Title: Morcha of Anganwadi workers' district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Morchaमोर्चा