अतिक्रमणित व्यावसायिकांचा नगर परिषदेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 09:57 PM2018-01-20T21:57:01+5:302018-01-20T21:57:13+5:30

येथील नगर परिषदेतर्फे शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान पोलीस स्टेशन परिसरातील अतिक्रमण हटवून येथील दुकानदारांना जि.प. दवाखान्याच्या जुन्या इमारतीच्या परिसरात जागा उपलब्ध करुन देण्यात आली.

 Morcha on encroached professionals' council of municipal council | अतिक्रमणित व्यावसायिकांचा नगर परिषदेवर मोर्चा

अतिक्रमणित व्यावसायिकांचा नगर परिषदेवर मोर्चा

Next
ठळक मुद्देनगराध्यक्षांना दिले निवेदन : तोडगा काढण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : येथील नगर परिषदेतर्फे शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान पोलीस स्टेशन परिसरातील अतिक्रमण हटवून येथील दुकानदारांना जि.प. दवाखान्याच्या जुन्या इमारतीच्या परिसरात जागा उपलब्ध करुन देण्यात आली. मात्र आधीच्या जागेवरुन दुकाने हटविल्याने त्यांच्या विक्रीत घट झाल्याने त्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या विरोधात अतिक्रमण बाधित व्यावसायीकांनी शुक्रवारी (दि.२०) नगर परिषदेवर मोर्चा काढून नगराध्यक्षांना निवेदन दिले.
रफिक शेख यांच्या नेतृत्वात नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. यानंतर मोर्चेकºयांच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्षा सोनाली देशपांडे यांची भेट घेतली. नगराध्यक्षा चव्हाण यांनी मोर्चेकºयांच्या मागण्या ऐकूण घेतल्या. शहरवासीयांच्या हितांची जोपासना करणे हेच आमचे कार्य असून ते आम्ही ते करित असल्याचे सांगितले. व्यावसायीकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर यांनी जिथे दुकानांची व्यवस्था केली ती जागा जि.प.ची असल्याचे सांगितले. २८ आर. ही. जागा न.प.ला हस्तांतरित झाली आहे. अतिक्रमण काढण्याचे काम चंद्रभागा नाका ते स्नेहल टॉकीजपर्यंत होणार आहे. दुकाने हटविले त्या ठिकाणी पाणी रस्ते, स्वच्छतागृह यांची सुविधा केली जाणार आहे. सर्वांचे भले व्हावे हाच सकारात्मक विचार आमचा असल्याचे सांगून ही जागा म्हणजे हार्ट आॅफ द सिटी असल्याचे सांगून तुमच्या पुढील पिढीला फायदा होईल असे पालांदूरकर यांनी सांगितले. माजी नगराध्यक्ष अजय गौर यांनी दुसरी जागा तुमच्या लक्षात असल्यास सूचविण्यास व्यावसायीकांना सांगितले. मोर्चेकºयांनी अतिक्रमण हटाव मोहीमेदरम्यान दुजाभाव होणार नाही याची काळजी घेण्याची विनंती केली. मुख्याधिकारी शासकीय कामानिमित्त बाहेर असल्याने नगराध्यक्षा सोनाली देशपांडे यांनी उपाध्यक्ष सुनील पालांदूरकर, न.प. सदस्य अजय गौर, संतोष मोहने, प्रभु असाटी तसेच अशोक अरोरा, शामराव भोंडेकर यांच्या उपस्थित निवेदन स्विकारले. शिष्टमंडळात प्रकाश गेडाम, अजय वैद्य, इकबालभाई, महेंद्र बडगे, सुरेंद्रकुमार शुक्ला, आसिफ मिर्झा, संदीप नारनवरे यांचा समावेश होता.

Web Title:  Morcha on encroached professionals' council of municipal council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.