बोलण्यापेक्षा कामावर जास्त विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 10:15 PM2018-04-08T22:15:42+5:302018-04-08T22:15:42+5:30

भारतीय जनता पक्षाच्या काही बडबोल्या नेत्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २३ हजार रूपयांची मंजूर झाल्याचे सांगत स्वत:चे कौतूक करून होर्डींग्स लावून घेतले.

More faith at work than speaking | बोलण्यापेक्षा कामावर जास्त विश्वास

बोलण्यापेक्षा कामावर जास्त विश्वास

Next
ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्राम दतोरा येथील रस्त्याचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भारतीय जनता पक्षाच्या काही बडबोल्या नेत्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २३ हजार रूपयांची मंजूर झाल्याचे सांगत स्वत:चे कौतूक करून होर्डींग्स लावून घेतले. वास्तविक शेतकºयांना मदत न करणे हे भाजपचे अपयश अहे. मात्र विधानसभेत तिव्र आंदोलन छेडून आम्ही हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत, धानावर ५०० रूपये क्वींटल बोनस व सरसकट कर्ज माफीची मागणी रेटून धरली. यावर शासन शेतकऱ्यांची मदत करण्यास बाध्य झाली आहे. कारण, आम्ही बोलण्यापेक्षा कामावर जास्त विश्वास ठेवत असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
ग्राम दतोरा येथे १० लाख रूपयांच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सिमा मडावी, सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, हरी काळे, बंटी भेलावे, उर्मिला महारवाडे, भोजराज चुटे, अनिता शिवणकर, रामदास गणवीर, सुरेश चुटे, प्रतिमा कांबळे, सवीता कावडे, सुरेखा डोंगरे, छाया चुटे, छाया शिवणकर, विजय पाथोडे, शिवशंकर हेमणे, भुमेश चौरे, अनंतराम पाथोडे, गणपत महारवाडे, देवानंद कावडे, महेंद्र कोरे, सेवंता हेमणे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Web Title: More faith at work than speaking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.