रस्ते अपघातांपेक्षा कोरोनानेच गेले जास्त जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:19 AM2021-06-27T04:19:47+5:302021-06-27T04:19:47+5:30

गोंदिया : कोरोनाने थैमान घातल्यामुळे मागील मार्च महिन्यापासून लॉकडाऊन व काही ना काही निर्बंधांमुळे वाहतुकीचे प्रमाण घटत चालले आहे. ...

More lives were lost in Corona than in road accidents | रस्ते अपघातांपेक्षा कोरोनानेच गेले जास्त जीव

रस्ते अपघातांपेक्षा कोरोनानेच गेले जास्त जीव

Next

गोंदिया : कोरोनाने थैमान घातल्यामुळे मागील मार्च महिन्यापासून लॉकडाऊन व काही ना काही निर्बंधांमुळे वाहतुकीचे प्रमाण घटत चालले आहे. परिणामी नागरिकांच्या अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे जिल्ह्यातील अपघातांच्या आकडेवारींवरून समजून येत आहे. कोरोनापू‌र्वी अपघातांमुळे नागरिकांनी नाहक जीव जात असल्याची खंत वाटत होती. मात्र मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला व तेव्हापासून लोकांची जीव आणखीच स्वस्त झाला असून कोरोनामुळे वृध्दच काय तरुणांचाही जीव गेला आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात मार्च २०२० पासून आतापर्यंत ६९९ लोकांचा जीव गेला असतानाच सन २०१८ व २०१९ मध्ये ३३४ लोकांचा अपघातांत जीव गेल्याची नोंद आहे. म्हणजेच, अपघाती मृत्यूचे प्रमाण कोरोनाने मागे टाकले असून या दोन्ही प्रकारात मात्र लोकांची नाहक जीव जाताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे, कोरोना आल्यापासून भल्याभल्यांचा जीव गेला असून कोरोनाने लोकांचा जीव आणखीच स्वस्त करून टाकला आहे.

-----------------------------

लॉकडाऊनमध्ये अपघात झाले कमी, पण...

कोरोनामुळे आतापर्यंत दोनदा लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यामुळे संचारबंदी लावली जात असल्याने घराबाहेर निघणेही कठीण होते. शिवाय जिल्हाबंदीमुळे लांबचा प्रवास ही बंदच असतो. परिणामी रस्ते अपघातांचे प्रमाण घटले असून या ६ महिन्यांत ८९ अपघातांची नोंद आहे.

- मात्र सन २०२० मध्ये जेथे अपघातांत १४० व सन २०२१ मध्ये आतापर्यंत ५२ लोकांचा जीव गेला असतानाच मार्च २०२० पासून कोरोनामुळे तब्बल ६९९ लोकांचा जीव गेला आहे. म्हणजेच, कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण अपघाती मृत्यूपेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे.

-----------------------------

पायी चालणाऱ्या व्यक्तींनाही धोका

शहरातील कुडवा रिंगरोड येथे सकाळी पायी फिरणाऱ्यांची संख्या चांगलीच असते. विशेष म्हणजे, येथे पायी फिरण्यासाठी गेलेल्या कित्येक नागरिकांना वाहनांनी उडविल्याच्या घटना घडल्या आहेत. आता या ६ महिन्यात ७ नागरिकांना अशाच प्रकारे वाहनांनी उडविल्याचे दिसते. यामुळे पायी चालणाऱ्यांनाही धोका आहेच.

---------------------------

मृतांमध्ये तरुणच अधिक

जिल्ह्यात घडत असलेल्या अपघाती मृत्युमध्ये ३५-५० वयोगटातील व्यक्तींचीच संख्या जास्त असल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेकडून कळले. विशेष म्हणजे, तरुणांना दुचाकी असो की चारचाकी वाहन भरधाव वेगात चालविण्याचे फॅड असते. हेच फॅड अपघातांना व पुढे अपघाती मृत्यूला कारणीभूत ठरते.

---------------------------

या ठिकाणी वाहने हळू चालवा

शहरातील बालाघाट रोड टी-पॉईंट व कुडवा नाका हे दोन ठिकाण अपघातप्रवण स्थळ‌ आहेत. येथे आतापर्यंत कित्येकांचा जीव गेला आहे. त्याचप्रकारे जयस्तंभ चौक, जुना उड्डाणपूल हे सुद्धा तेवढेच धोकादायक स्थळ म्हणून शहरात गणले जातात. त्यामुळे येथून वाहन जपून चालविणेच चांगले आहे.

---------------------------------

आपले जीवन अमूल्य आहे

वेळ वाचविण्याच्या नादात भरधाव वेगात वाहन चालविताना अपघात घडल्याने जबर मारला होता. सुदैवाने अपघातातून बचावलो. तेव्हा कळले आपले जीवन अमूल्य असून त्याच्याशी खेळ करणे कधीच परवडणारे नाही.

- देवीदास बिसेन

----------------------------

वाहन अपघातात पायाला जबर मार लागला असून त्यामुळे चालताना आजही त्रास होतो. नशीब बलवत्तर असल्यामुळे त्या अपघातातून जीव वाचला. मात्र पायाचा त्रास जीवनभरासाठी लागला आहे. आपले जीवन सर्वात किमती आहे, त्यामुळे वाहन जपून चालविणेच बरे.

- अशोक वाढई

Web Title: More lives were lost in Corona than in road accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.