गोंदियात मोठा अपघात! ५०हून अधिक लोक जखमी; दोन ट्रेन आल्या एकाच ट्रॅकवर, रुग्णालायत उपचार सुरु
By नरेश रहिले | Published: August 17, 2022 09:03 AM2022-08-17T09:03:56+5:302022-08-17T09:07:09+5:30
मध्य रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला असून एकाच ट्रेकवर दोन ट्रेन नागपूरच्या दिशेनं जात होत्या.
गोंदिया : रायपुरकडून नागपुरच्या दिशेने जाणाऱ्या 'भगत की कोठी' ट्रेनला गोंदिया शहरा जवळ अपघात झाला. भगत की कोठी ट्रेनने समोर जात असलेल्या मालगाडीला मागून धडक दिली. यामुळे भगत की कोठी ट्रेनचे ३ डब्बे रुळाखाली घसरले. अपघातात ५३ जणांपेक्षा जास्त लोक जखमी, तर १३ जण किरकोळ जखमी झाले आहे. या सर्व लोकांवर जिल्हा सामान्य रुग्णालय व तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मध्य रात्रीच्या सुमारास हा अपघात घडला असून एकाच ट्रॅकवर दोन ट्रेन नागपूरच्या दिशेनं जात होत्या. भगत की कोठी ट्रेनला ग्रीन सिग्नल मिळाल्याने ही गाडी समोर निघाली होती. मात्र याच रुडावर मालगाडी समोर चालत असताना गोंदिया शहराला लागून असलेल्या रेल्वे गेटवर सिगनल व्यवस्थित न मिळाल्याने भगत कोठी ही ट्रेन मालगाडीला धडकली अशी माहिती आहे.
Maharashtra | More than 50 persons were injured after 3 bogies of a train derailed in Gondia around 2.30 am at night. A collision b/w a goods train & passenger train led to this accident. No deaths reported. Train was on its way from Bilaspur, Chhattisgarh to Rajasthan's Jodhpur pic.twitter.com/Fxzmdbvhw8
— ANI (@ANI) August 17, 2022