मोरगाववासीयांनी केला भावेश जनबंधूचा सत्कार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:28 AM2021-05-14T04:28:25+5:302021-05-14T04:28:25+5:30

बाराभाटी : विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर व प्रथम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर विभागात १ ...

Morgaon residents felicitate Bhavesh Janbandhu () | मोरगाववासीयांनी केला भावेश जनबंधूचा सत्कार ()

मोरगाववासीयांनी केला भावेश जनबंधूचा सत्कार ()

googlenewsNext

बाराभाटी : विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर व प्रथम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर विभागात १ मे रोजी सुरु करण्यात आलेला ‘शाळेबाहेरची शाळा’ या उपक्रमांतर्गत जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोरगाव येथील विद्यार्थी भावेश भीमराव जनबंधू या विद्यार्थ्यांची मुलाखत आकाशवाणी नागपूर केंद्रावर प्रसारित झाली. याबद्दल शाळा व गावकऱ्यांच्या वतीने भावेशचा सत्कार करण्यात आला.

आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून मंगळवार, गुरुवार, शनिवार या दिवशी सकाळी १०. ३५ वाजता प्रसारित होत असतो. तसेच यु-ट्यूब लिंक ‘न्यूज व एअर अप्लिकेशन’, प्रथम महाराष्ट्र अप्लिकेशन, या माध्यमाच्या माध्यमातून ऐकता येतो. इतर दिवशी व्हाॅट्सॲपच्या या माध्यमातून शाळेतील शिक्षक, पालक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवक यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जातात. कोविडच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी मुलांचे अभ्यास मात्र बंद होऊ नये म्हणून विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांच्या प्रेरणेने हा आकाशवाणी कार्यक्रम सुरु करण्यात आला.

आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यातील एकूण ३२ विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्यात. हा कार्यक्रम प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुमार डांगे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, गटशिक्षणाधिकारी आर. एल. मांढरे, नोडल अधिकारी तथा गटसाधन केंद्राचे विषयतज्ज्ञ धोके, सत्यवान शहारे प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे जिल्हा समन्वय अविनाश चतुरकर, भूषण निषाने, राजेश दुधारे यांच्या मार्गदर्शनातून कार्यक्रमाचे नियोजन करून १३ मे रोजी प्रसारित करण्यात आला.

....

भावेशने उंचावली गावकऱ्यांची मान

मोरगाव सारख्या एका लहानशा गावातील शेतमजुरांच्या मुलांनी आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीने शाळा, तसेच गावाची मान उंचावली आहे. सरपंच विजया उईके, मुख्याध्यापिका रेखा गोंडाणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुनेश्वर शहारे यांनी पुष्पगुच्छ देऊन भावेशचा सत्कार केला. पदवीधर शिक्षक सु.मो भैसारे, विषय शिक्षक पुरुषोत्तम गहाणे, मोहन नाईक, वामन घरतकर, जितेंद्र ठवकर, अचला कापगते-झोडे, प्राची कागणे-ठाकूर, उमा राऊत यांनी कौतुक केले आहे.

Web Title: Morgaon residents felicitate Bhavesh Janbandhu ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.