मुंबई मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये सर्वाधिक गर्दी, आरक्षण मिळेना !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:33 AM2021-09-12T04:33:42+5:302021-09-12T04:33:42+5:30
.................. मुंबई, पुण्याचे तिकीट मिळेना - रेल्वेने अद्यापही विशेष गाड्या सुरू ठेवल्या आहेत. त्यामुळे या गाड्यांमध्ये आरक्षण केल्याशिवाय प्रवास ...
..................
मुंबई, पुण्याचे तिकीट मिळेना
- रेल्वेने अद्यापही विशेष गाड्या सुरू ठेवल्या आहेत. त्यामुळे या गाड्यांमध्ये आरक्षण केल्याशिवाय प्रवास करता येत नाही.
- आता सर्वच व्यवहार सुरळीत झाले असून, रेल्वे गाड्यांमधील गर्दी वाढली आहे.
- सणासुदीचे दिवस असल्याने मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ, नाशिककडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये आरक्षण तिकीट मिळणे कठीण झाले आहे.
- मुंबई मार्गावरील सर्वच गाड्यांमध्ये गर्दी असून, आरक्षण तिकिटासाठी लांब वेटिंग लिस्ट आहे.
- तर पुढील महिन्यासाठी हावडाकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये आरक्षण केले जात आहे.
.........
सध्या सुरू असलेल्या गाड्या
गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस
हावडा-पुणे-आझाद एक्स्प्रेस
हावडा-मुंबई मेल
जबलपूर- चांदाफोट,
अहमदाबाद-पुरी
समता एक्स्प्रेस
गोंदिया-कोल्हापूर-महाराष्ट्र एक्स्प्रेस
......................................
हावडा मार्गावर सर्वात कमी गर्दी
सध्या मुंबईकडून हावडाकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये गर्दी कमी आहे, तर हावडाकडून मुंबईकडे जाणाऱ्या सर्वच गाड्यांमध्ये सध्या सर्वाधिक गर्दी आहे. या गाड्यांमध्ये आरक्षण मिळणेसुध्दा कठीण झाले आहे. शंभर ते दीडशेच्या वर वेटिंग आहे.
............
ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग
- सध्या विशेष गाड्या सुरू असून या गाड्यांमध्ये गर्दी वाढली आहे.
- मात्र मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
- यामुळे कोरोनाचा संसर्गात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- रेल्वे गाड्यांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.