प्रशासकीय इमारतीतून मोटारसायकल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:30 AM2021-08-15T04:30:31+5:302021-08-15T04:30:31+5:30

......................... नातवाने दिली आजीला ठार करण्याची धमकी गोंदिया : शहरातील गौतमनगरातील मंगला रामसिंग चंदेल (६५) यांना त्यांच्या मुलीचा मुलगा ...

Motorcycle lamps from the administrative building | प्रशासकीय इमारतीतून मोटारसायकल लंपास

प्रशासकीय इमारतीतून मोटारसायकल लंपास

Next

.........................

नातवाने दिली आजीला ठार करण्याची धमकी

गोंदिया : शहरातील गौतमनगरातील मंगला रामसिंग चंदेल (६५) यांना त्यांच्या मुलीचा मुलगा विक्रम पवनसिंह बैस (३५ रा. गौतमनगर) याने १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पैशांच्या व्यवहारावरून शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी दिली. आजीच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

.................

मीटर लावण्याच्या कारणावरून धमकी

गोंदिया : शहरातील सिंधी कॉलनी येथील राधास्वामी डेराजवळ राहणाऱ्या ईश्वरलाल भानुदास चिमनानी (४०) यांना आरोपी भगवानदास हिंददास खटवाणी (६५) व तुलसीदास भगवानदास खटवानी (४०) यांनी १३ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता मीटर लावण्याच्या कारणावरून वाद करून शिवीगाळ करीत ठार करण्याची धमकी दिली. या घटनेसंदर्भात शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

...................

लहान मुलीला विहिरीत फेकण्याची पत्नीला धमकी

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बंडू चौक संजय नगरातील आरोपी नासिर खान (३५) याने १३ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता पत्नीला शेजारच्या घरी कशाला जातेस असे म्हणून अश्लील शिवीगाळ करून तिला ठार मारण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर तू शेजारच्या घरी गेल्यास लहान मुलीला विहिरीत फेकून देण्याची धमकी आरोपीने दिली. हसीना खान यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

.............................

शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पंचशील झेंड्याजवळ लक्ष्मी नगरात राहणाऱ्या देवकन्या भोजराज बडगे (६०) यांना व त्यांच्या पतीला आरोपी रतन सुभाष मेश्राम (२०, रा. पंचशील झेंड्याजवळ, लक्ष्मीनगर) यांनी १३ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वाजता शिविगाळ करून ठार करण्याची धमकी दिली. यासंदर्भात १४ ऑगस्ट रोजी पोलिसांनी भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

...............................

दोन किराणा दुकानदारांवर गुन्हा दाखल

गोंदिया : बंदच्या दिवशी दुकान सुरू ठेवणाऱ्या दोन किराणा दुकानदारांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गोंदिया शहरातील लक्ष्मी किराणा दुकानात १ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० वाजता आरोपी मनीष मोहनलाल चांदवानी (३०, रा. राजेंद्र वाॅर्ड सिंधी कॉलनी) याने किराणा दुकान सुरू ठेवून आपल्या दुकानात १० लोक उभे केले होते. तसेच सिव्हील लाईन्स परिसरातील लक्ष्मी किराणा दुकानजार अमित ठाकूरदास ठाकरानी (५५, रा. हरीकाशीनगर सिंधी कॉलनी) गोंदिया याने १ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता आपले किराना दुकान सुरू ठेवले होते. त्यांच्याविरुद्ध शहर पोलिसांनी भादंविच्या कलम १८८, २६९,२९०, सहकलम ५१ (ब) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, कलम २,३ साथीचा रोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

............................

त्या मृतदेहाची ओळख पटली नाही

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या उड्डाणपुलाच्या डाक कार्यालयाजवळ १ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता मृतावस्थेत आढळलेल्या ६५ वर्षे वयोगटातील इसमाची ओळख अजूनही पटली नाही. मृत ५ फूट ४ इंच उंच, रंग सावळा, केस पांढरे, मजबूत बांधा असलेला आहे. त्याला उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात नेले असता डॉ. भूषण राठोड यांनी मृत घोषित केले. यासंदर्भात शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. त्याच्या नातेवाईकांची ओखळ पटविण्यासाठी पोलीस हवालदार मिताराम गणवीर प्रयत्न करीत आहेत.

....................

सिंगलटोलीतील वृध्दाचा मृत्यू

गोंदिया : शहरातील आंबेडकर वॉर्ड येथील रमेशभाई बन्सीलाल कंसारे (७०) यांना १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता उपचारासाठी येथील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. डॉ. भूषण राठोड यांनी त्यांना मृत घोषित केले.

Web Title: Motorcycle lamps from the administrative building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.