नगरसेवक शर्मा यांना अपात्र ठरविण्यासाठी हालचाली
By Admin | Published: June 30, 2016 01:46 AM2016-06-30T01:46:27+5:302016-06-30T01:46:27+5:30
नगरसेवक शिव शर्मा यांना अयोग्य घोषित करण्यासंबंधी दाखल तक्रारीवर २८ जून रोजी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासमोर सुनावणी करण्यात आली.
गोंदिया : नगरसेवक शिव शर्मा यांना अयोग्य घोषित करण्यासंबंधी दाखल तक्रारीवर २८ जून रोजी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासमोर सुनावणी करण्यात आली.
याप्रकरणी नगरसेवक राकेश ठाकूर, शीला इटानकर, ममता बन्सोड, सीमा भालेराव, दीपक नशीने, अनिता बैरीसाल, निर्मला मिश्रा व व्यंकट पाखरू यांनी ५ फेब्रुवारी २०१६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला होता. अशाच प्रकारे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी ४ मे २०१६ रोजी आपली तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना सोपविली आहे. त्यात शर्मा यांना कोणत्या निमयांतर्गत अयोग्य घोषित करण्यात यावे याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांच्यासमोर नगरसेवक राकेश ठाकूर यांनासुद्धा अयोग्य घोषित करण्याचे प्रकरण आहे. यात ठाकूर यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून तिच्या लीजची मागणी केली आहे. राकेश ठाकूर यांच्या अयोग्यतेचे प्रकरण मागील तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. या सुनावणीदरम्यान शर्माच्या बाजूने अॅड.गिरीश बापट व अॅड.संदीप जैन यांनी काम सांभाळले. (प्रतिनिधी)