शाळा सुरू करण्याच्या हालचाली; मग महाविद्यालये का नाहीत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:33 AM2021-07-14T04:33:48+5:302021-07-14T04:33:48+5:30
गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याने शालेय शिक्षण विभागाने शाळा, महाविद्यालये टप्प्या -टप्य्याने सुरू करण्यास सुरुवात केली ...
गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याने शालेय शिक्षण विभागाने शाळा, महाविद्यालये टप्प्या -टप्य्याने सुरू करण्यास सुरुवात केली आहे. १५ जुलैपासून शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मग महाविद्यालयांना सुरू करण्याच्या हालचाली का केल्या जात नाही. गोंदिया जिल्ह्यात एकूण ४५ महाविद्यालय आहेत. तब्बल दीड वर्षानंतरही महाविद्यालये बंदच आहेत. महाविद्यालय सुरु कधी होणार हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आता महाविद्यालये सुरू करायला हवेत असा सूर उमटत आहे. महाविद्यालय सुरू करून विद्यार्थ्यांना कोरोना संदर्भातील नियम पाळले जावेत अशा सूचना दिल्या जाव्यात.
.........................
प्राचार्यांची तयारी
महाविद्यालये सुरू करताना जिल्हाधिकारी आणि शिक्षण विभाग ज्या सूचना देतील त्या पाळल्या जातील. सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांची कोरोना चाचणी, विद्यार्थ्यांच्या पालकांचे सहमतीपत्र आवश्यक आहे. त्यामुळे या सर्व बाबींची पूर्तता करून आणि कोरोना नियमांचे पालन करूनच सूचना मिळाल्यावर महाविद्यालय सुरू करण्यात येईल.
- डॉ. अंजन नायडू,
प्राचार्य डी. बी. सायन्स महाविद्यालय
...............
शाळा सुरू होण्याच्या हालचाली दिसत आहेत. परंतु महाविद्यालय सुरू करण्यासाठी कसल्याही प्रकारचे पत्र आम्हाला सद्या प्राप्त झाले नाही. विद्यापीठाकडून जशा सूचना येतील त्या सूचनेनुसार काम केले जाणार आहे.
- भूपेश मेंढे, प्राचार्य शंकरलाल अग्रवाल महाविद्यालय, सालेकसा.
..............
जिल्ह्यातील एकूण महाविद्यालये-४५
एकूण विद्यार्थी संख्या- १३५००
शाखानिहाय विद्यार्थी
विज्ञान - ४०५०
वाणीज्य- २२५०
कला-७२००
.................
विद्यार्थीही प्रतिक्षेत
मागील दोन वर्षापासून महाविद्यालय सुरू झाले नाही. ऑनलाइन अभ्यास करावा लागत आहे. कधी कॉलेज सुरू होणार आणि कधी मित्रांना भेटणार असे वाटत आहे.
- राकेश शिवणकर, पदमपूर
...........
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षीपासून महाविद्यालय बंद आहेत. सर्व ऑनलाइन सुरू असल्याने घरी राहूनसुद्धा कंटाळा आला होता. आता शाळा सुरू होण्याच्या हालचाली होत आहेत. महाविद्यालय कधी सुरू होणार याची प्रतीक्षा आहे.
- विजय कोरे, आमगाव