खासदार मेंढे यांनी घेतला विविध योजनांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:54 AM2021-03-04T04:54:39+5:302021-03-04T04:54:39+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, सर्व खंडविकास अधिकारी आणि प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. यात प्रधानमंत्री आवास ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी, सर्व खंडविकास अधिकारी आणि प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्ह्याला असलेले उद्दिष्ट आणि त्या तुलनेत झालेली लक्षपूर्ती या विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यात आली. ज्यांच्याकडे घरकुलासाठी जागा उपलब्ध नाही, त्यांच्यासंदर्भात करावयाच्या उपाययोजना, घरकूल बांधण्यासाठी ५ ब्रास रेती देण्यासंदर्भात चर्चा यावेळी करण्यात आली. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अधिकाधिक लोकांना काम देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना खासदारांनी केल्या. ग्रामीण भागात गुरांच्या गोठ्याचे असलेले उद्दिष्ट वाढवून देण्यासाठी निर्देशही यावेळी करण्यात आले. १४ आणि १५व्या वित्त आयोगाच्या कामांचे नियोजन वेळेत करावे आणि सर्व कामे पूर्ण होतील, या दृष्टीने यंत्रणेला कामाला लावावे, अशा सूचना करण्यात आल्या. आरोग्य विभागाच्या संदर्भात या बैठकीत खासदारांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून आढावा घेतला. बैठकीला माजी आमदार रमेश कुथे, भाजपा जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी, गजेंद्र फुंडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.