घरकुलाच्या मुद्यांवरून खासदारांंनी तहसीलदारांना खडसावले ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:29 AM2021-04-04T04:29:49+5:302021-04-04T04:29:49+5:30

परसवाडा : तालुक्यातील रखडलेले घरकुलांचे बांधकाम, रेती तस्करीत झालेली वाढ, मनरेगाच्या कामांचासुद्धा पूर्णपणे बोजवारा उडाला असून नागरिकांच्या तक्रारीत मोठ्या ...

MPs scold tehsildars over household issues () | घरकुलाच्या मुद्यांवरून खासदारांंनी तहसीलदारांना खडसावले ()

घरकुलाच्या मुद्यांवरून खासदारांंनी तहसीलदारांना खडसावले ()

googlenewsNext

परसवाडा : तालुक्यातील रखडलेले घरकुलांचे बांधकाम, रेती तस्करीत झालेली वाढ, मनरेगाच्या कामांचासुद्धा पूर्णपणे बोजवारा उडाला असून नागरिकांच्या तक्रारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांवर योग्य उत्तरे देता न आल्याने खा. सुनील मेंढे यांनी चांगलेच खडसावले.

तिरोडा पंचायत समितीची आढावा सभा शुक्रवारी पंचायत समिती सभागृहात खा. सुनील मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली व आ. विजय रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. तहसीलदार प्रशांत घोरुडे, गटविकास अधिकारी प्रकाश गंगापारी, कृउबास सभापती डॉ. चिंतामन रहांगडाले, भाजप तालुका अध्यक्ष भाऊराव कठाणे, माजी जि. प. उपाध्यक्ष मदन पटले, डॉ. बी. एस. रहांगडाले, सर्व विभाग प्रमुख व सरपंच बैठकीला उपस्थित होते. प्रधानमंत्री घरकुल बांधकामाची माहिती कनिष्ठ अभियंता मलेवार सादर केली. यात सन २०१६ ते २१ पर्यंत प्राप्त उद्दिष्टे १३,४७८ पैकी मजूर १३,३८२ प्रकरण शिल्लक ९६, पूर्ण काम ३०३, अपूर्ण काम १०,३४४, रमाई आवास योजना २०१६-२०२०, प्राप्त उद्दिष्ट १३००, मंजूर ८५४, शिल्लक ४४, पूर्ण कामे ४३२, अपूर्ण काम ३७६ व समाज कल्याण विभाग गोंदियाकडे एक वर्षापासून ३६४ प्रस्ताव व जिल्हा ग्रामीण यंत्रणेकडे १८१ प्रस्ताव प्रलबिंत आहे. शबरी आवास योजना २०१६ ते २०२० प्राप्त उद्दिष्टेे १२२, मजूर ८९, शिल्लक ३३, पूर्ण काम ३०, अपूर्ण काम ५९ असून तिन्ही योजनाचे एकूण घरकुल १४,३२५ पैकी फक्त ३,४९८ घरकुलाचे काम पूर्ण झाले आहे. १०,७७९ घरकुल अपूर्ण आहे. यावर खा. मेंढे यांनी प्रश्न उपस्थित केला असता एकही अधिकारी, कनिष्ठ अभियंता उत्तर देऊ शकले नाही. या प्रकारामुळे खा. मेंढे चांगलेच संतापले. तालुक्यातील रेती घाटांवरून रेतीचा अवैध उपसा होत असल्याबद्दल तहसीलदार प्रशांत घोरुडे यांना मेंढे यांनी चांगलेच धारेवर धरले. कवलेवाडा बैलगाडी रेती प्रकरण, शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर पकडणे, शेतकऱ्यांना तलाठी त्रास देत असल्याचा प्रकार खपवून घेणार नसल्याचे सांगितले. बारबरीक कंपनीला विना रॉयल्टी गौण खनिजाची होत असलेल्या वाहतुकीचा प्रश्न मनोहर बुद्धे यांनी लावून धरला.

.......

कामात दिरंगाई खपवून घेणार नाही

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तलाव खाेलीकरण, नाला सरळीकरण १४१, पांदण रस्ते ५६, कॅटल रोड ४१८, वृक्ष लागवड १५, इतर ६८ कामे सुरू असल्याचे भूवन पेशने यांनी सांगितले. कोविड-१९ बद्दल माहिती खासदार यांनी दिली. आरोग्य विभाग, कृषी, पंचायत, पशुसंवर्धन, लघु सिंचाई बांधकाम, शिक्षण, महिला बाल कल्याण, पाणी पुरवठा या विषयावर चर्चा व आढावा घेण्यात आला नाही. अधिकाऱ्यांच्या कामचुकार धोरणाबद्दल खा. मेंढे यांनी नाराजी व्यक्त केली.

.......

Web Title: MPs scold tehsildars over household issues ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.