२०९४ विद्यार्थ्यांनी दिली एमपीएससी पूर्व परीक्षा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:33 AM2021-09-05T04:33:25+5:302021-09-05T04:33:25+5:30
गोंदिया : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२० शनिवारी (दि. ४) जिल्ह्यातील एकूण ११ ...
गोंदिया : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२० शनिवारी (दि. ४) जिल्ह्यातील एकूण ११ परीक्षा केंद्रांवरून घेण्यात आली. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण ३१०६ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले होते. यापैकी २०९४ विद्यार्थ्यांनी ११ परीक्षा केंद्रांवरून परीक्षा दिली तर तब्बल १०६२ विद्यार्थी गैरहजर होते. सर्वच केंद्रावरून परीक्षा सुरळीत पार पडली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२० शनिवारी जिल्ह्यातील एकूण अकरा उपकेंद्रांवर सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत गोंदिया येथील एस.एस. गर्ल्स कॉलेज, विठ्ठलनगर, एस.एस. अग्रवाल म्युनिसिपल गर्ल्स हायस्कूल, विठ्ठलनगर, मनोहर म्युनिसिपल हायर सेकंडरी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज इंदिरा गांधी स्टेडियमजवळ, धोटे बंधू सायन्स कॉलेज, कुडवा रोड रामनगर, सेंट झेविअर्स हायस्कूल विजयनगर, बालाघाट रोड, बी.एन. आदर्श सिंधी विद्यामंदिर हायस्कूल मुर्री रोड, गुजराती नॅशनल हायस्कूल, रेलटोली, साकेत पब्लिक स्कूल बजाजनगर, फुलचूर रोड, विवेक मंदिर स्कूल हरिओम कॉलनी छोटा, गोंदिया, रवींद्रनाथ टागोर हायस्कूल, रेलटोली, राजस्थान कन्या विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स कृष्णपुरा वाॅर्ड मोटवानी चेंबरजवळ, गोंदिया या परीक्षा केंद्रावरून घेण्यात आली. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता परीक्षा केंद्रावर प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयाचे पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनात शुक्रवारीच सर्व व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला होता. त्यामुळे शनिवारी सर्वच केंद्रावरून सुरळीत परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण ३१०६ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले होते. यापैकी २०९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर तब्बल १०६२ विद्यार्थी गैरहजर होते.
.................