नावातील ताई-बाईने अनेक अर्ज मिसमॅच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 09:12 PM2019-03-05T21:12:48+5:302019-03-05T21:14:14+5:30

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे अर्ज महाआॅनलाईनवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. माहिती अपलोड करताना कृषी व महसूल विभागाकडून माहिती भरताना अनेकांचे अर्ज नावातील घोळामुळे अपात्र होत आहे.

Ms. Mismatch has many names in the name Tai-Bai | नावातील ताई-बाईने अनेक अर्ज मिसमॅच

नावातील ताई-बाईने अनेक अर्ज मिसमॅच

googlenewsNext
ठळक मुद्देप्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना : पहिला हप्ता जमा करणे सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे अर्ज महाआॅनलाईनवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. माहिती अपलोड करताना कृषी व महसूल विभागाकडून माहिती भरताना अनेकांचे अर्ज नावातील घोळामुळे अपात्र होत आहे. कृषी विभागाने माहिती अपलोड करताना काही लाभार्थ्यांच्या नावासमोर ताई तर आधारकार्डवर बाई असा उल्लेख आहे. परिणामी अनेक अर्जाची माहिती जुळत नसल्याने ते अर्ज मिस मॅच होत असल्याने कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन जमा केले जाणार आहे. सध्या या योजनेचा पहिला २ हजार रुपयांचा हप्ता जमा करण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण २ लाख ५४ हजार १४२ शेतकरी खातेदार असून यापैकी या योजनेस १ लाख ७२ हजार ८१७ शेतकरी पात्र ठरले. तर यापैकी आत्तापर्यंत १ लाख १६ हजार ९८३ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या योजनेचा पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील दोन हेक्टर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या संकेत स्थळावर अपलोड आहे.
मात्र पुन्हा या माहितीची खातरजमा करण्यासाठी महसूल व कृषी विभागाकडून महाआॅनलाईन या संकेतस्थळावर शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याचे काम सुरू आहे. मात्र बऱ्याच सातबारावर लाभार्थी महिला शेतकऱ्याच्या नावासमोर ताई असा तर त्यांनी सादर केलेल्या आधारकार्ड व इतर कागदपंत्रावर बाई असा उल्लेख आहे.
त्यामुळे महाआॅनलाईन आणि कृषी विभागाची माहिती जुळत नसल्याने असे अर्ज सध्या अपात्र समजून पेडींग ठेवले जात आहे. नावातील घोळ दूर करण्यासाठी घोषणापत्र घेवून त्यांचे अपात्र अर्ज पुन्हा पात्र ठरविले जाणार आहे. मात्र यामुळे याद्या तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम फुटत आहे.

अनेक शेतकऱ्यांचे बँक खातेच नाही
जिल्ह्यात दोन हेक्टरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र बऱ्याच शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक नाही. तर बरेच शेतकरी हे जिल्ह्यात राहत नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता जमा करण्यास अडचण जात आहे.

कर्जमाफीचा विसर
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत सध्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता जमा करण्याचे काम जोमात सुरू आहे. मात्र या गडबडीत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत पात्र ठरलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याचा विसर पडला. जिल्ह्यातील पाच हजारावर शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहे.

आचार संहितेपूर्वी काम पूर्ण करा
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपये मानधन देण्याची घोषणा सरकारने आगामी निवडणुकांच्या तोंडावर केली. लोकसभा निवडणुकीची आचार संहिता पुढील चार पाच दिवसात केव्हाही होवू शकते. त्यापूर्वी पात्र सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या योजनेचा पहिला हप्ता जमा करण्यासाठी सरकारची लगबग सुरू आहे. तसे निर्देश सुध्दा संबंधित विभागाला दिले आहे. त्यामुळे कृषी आणि महसूल विभागाची यंत्रणा सध्या केवळ याच कामात व्यस्त आहे.

Web Title: Ms. Mismatch has many names in the name Tai-Bai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.