२.७८ लाख ग्राहकांवर महावितरणची ५४ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:30 AM2021-02-16T04:30:43+5:302021-02-16T04:30:43+5:30

गोंदिया : थकबाकीच्या समस्येने ग्रस्त असलेल्या वीज वितरण कंपनीला कोरोना लॉकडाऊन काळातील थकबाकीने आणखीच अडचणीत आणले आहे. आजघडीला महावितरणची ...

MSEDCL owes Rs 54 crore to 2.78 lakh customers | २.७८ लाख ग्राहकांवर महावितरणची ५४ कोटींची थकबाकी

२.७८ लाख ग्राहकांवर महावितरणची ५४ कोटींची थकबाकी

googlenewsNext

गोंदिया : थकबाकीच्या समस्येने ग्रस्त असलेल्या वीज वितरण कंपनीला कोरोना लॉकडाऊन काळातील थकबाकीने आणखीच अडचणीत आणले आहे. आजघडीला महावितरणची जिल्ह्यातील २,७७,८९६ वीज ग्राहकांवर ५४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. आता एवढी रक्कम वसूल करणे कठीण काम असूनही महावितरणचे त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

वीज ग्राहकांकडे असलेल्या थकबाकीला घेऊन जिल्हा नेहमीत अग्रेसर राहिला असून वीज वितरण कंपनीत नेहमीच वरिष्ठांच्या टार्गेटवर असतो. विशेष म्हणजे, लोकांकडून पैसा काढून घेणे हे सर्वात कठीण काम असून महावितरण आता याच कचाट्यात अडकले आहे. अगोदरच कोट्यवधींची थकबाकी असताना त्यात कोरोना काळातील थकबाकीने भर घातली आहे. आजची स्थिती बघितल्यास जिल्ह्यातील २,७७,८९६ वीज ग्राहकांवर महावितरणचे ५४ कोटी रुपये थकले आहेत. विशेष म्हणजे, ही फक्त घरगुती, व्यवसायिक व औद्योगिक वीज कनेक्शनधारकांची थकबाकी आहे. यात अन्य गटांतील थकबाकी जोडल्यास तो आकडा शेकडो कोटींच्या घरात जाणारा आहे. आता एवढी मोठी रक्कम अडकून पडल्याने महावितरण आर्थिक संकटात अडकले आहे. तरीही त्यांचे थकबाकीच्या वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

------------------------------

सर्वाधिक थकबाकीत गोंदिया आघाडीवर

-जिल्ह्यातील घरगुती, व्यवसायीक व औद्योगिक अशा २७,७,८९६ वीज ग्राहकांकडे अकडून पडलेल्या ५४ कोटींच्या या थकबाकीत गोंदिया तालुका आघाडीवर आहे. गोंदिया तालुक्यातील तिन्ही गटांतील ३६,७,५६ वीज ग्राहकांवर १२.५१ कोटी रुपयांची थकबाकी आहे.

-तर देवरी तालुक्यावर सर्वात कमी थकबाकी दिसून येत आहे. देवरी तालुक्यातील तिन्ही गटांतील २२,८,७२ वीज ग्राहकांवर २.२६ कोटींची थकबाकी आहे.

-----------------------------

घरगुती वीज ग्राहकांवर जास्त थकबाकी

महावितरणच्या घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक गटांतील वीज ग्राहकांकडील थकबाकी बघितल्यास यामध्ये २६,१,८६८ घरगुती वीज ग्राहकांवर ४३.१९ कोटींची थकबाकी आहे. तर १३,२०९ व्यावसायिक वीज ग्राहकांवर ६.१९ कोटींची थकबाकी असून २,८१९ औद्योगीक वीज ग्राहकांवर ४.६७ कोटींची अशी एकूण ५४ कोटींची थकबाकी आहे. मात्र यामध्ये घरगुती वीज ग्राहकांचीच थकबाकी सर्वात जास्त आहे.

----------------------------------

कोट

वीज ग्राहकांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या थकबाकीने महावितरणच्या कामकाजावर परिणाम पडतो. त्यात १ एप्रिलपासून कित्येक ग्राहकांनी वीज बिल भरलेले नाही. अशा थकबाकीदारांनी त्यांच्याकडे असलेली थकबाकी लवकरात लवकर भरून महावितरणला सहकार्य करावे.

- एस.पी. वाघमारे

अधीक्षक अभियंता, गोंदिया.

--------------------------------------

-घरगुती - ग्राहक संख्या २,६१,८६८- थकबाकी ४३,१९,००,०००

-व्यावसायिक - १३,२०९- ६,१९,००,०००

- औद्योगिक - २८१९- ४, ६७,००.०००

Web Title: MSEDCL owes Rs 54 crore to 2.78 lakh customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.